जांबूड येथील बेकायदेशीर वीटभट्टी बंद करण्याची मागणी : संबंधित अधिकार्यांच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह.. !

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील जांबूड येथील जांबूड -बोरगाव रस्त्यालगत वास्तव्यास असलेले सचिन श्रीमंत चंदनशिवे यांच्या कुटुंबामध्ये चुलत्यांच्या घरातील सदस्यांसहीत 17 व्यक्ती राहत असून सदर कुटुंब राहत असलेल्या पश्चिमेस 50 ते 70 फुटाच्या अंतरावरती सत्यवान शिवा चंदनशिवे यांची बेकायदेशीर पणे वीटभट्टी सुरु आहे.सदर वीटभट्टीच्या दूषित धुरामुळे सचिन श्रीमंत चंदनशिवे यांच्या कुटुंबातील व्यक्तींना श्वासणाचा त्रास होऊन आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तरी सदरची वीटभट्टी बंद करण्यात यावी व लोकवस्तीमध्ये बेकायदेशीर पणे वीटभट्टीचा व्यवसाय सुरु केल्याने सत्यवान शिवा चंदनशिवे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सचिन चंदनशिवे यांचे आज बुधवार दिनांक ०३ फेब्रुवारी पासून अकलुज येथील प्रांत कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरु आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जा. क्र. मप्रनिमं/उप्राकासो /123 हे तहसीलदार कार्यालय माळशिरस यांना व जांबूड ग्रामपंचायत जांबूड यांना पत्र काढलेले आहे.सदर पत्रानुसार तहसीलदार व ग्रामसेवक यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचा सचिन चंदनशिवे यांनी आरोप केला असून सदर वीटभट्टी बंद करण्यात यावी व वीटभट्टी चालक सत्यवान शिवा चंदनशिवे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सचिन चंदनशिवे यांचे कुटुंब व बाबासाहेब चंदनशिवे,भिमराव चंदनशिवे तसेच चंदनशिवे वस्तीवरील नागरिकांनी अकलुज येथे प्रांताधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे.प्रांताधिकारी कार्यालयातील कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्यांनी अद्याप उपोषण कर्त्याशी संवाद साधलेला नाही.त्यामुळे उपोषणकर्त्यांकडून संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजावर आरोपांच्या फायरी होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *