रयत शिक्षण संस्थेच्या कमवा आणि शिका योजनेतून कलेचा वसा मिळाला – मोहिनी देवकर
पिलीव प्रतिनिधी : जि प प्राथमिक शाळा पिलीव, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व जुनियर कॉलेज पिलीव व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथून कमवा आणि शिका योजनेसह बीएससी पदवी मिळवलेल्या मोहिनी रघुनाथ देवकर हिने रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कमवा आणि शिका योजने सोबतच बीएससी पर्यंतचे शिक्षण घेत चित्रकला व गृहिणी शिक्षणातून कला संपादित करत शिवजयंतीचे औचित्य साधून पद्मभूषण शिक्षण महर्षी कर्मवीर अण्णा आणि सौ लक्ष्मी वहिनी यांचे प्रेरणेतून घरगुती शिवजयंती साजरी करून स्वतः हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांचे छायाचित्र जसेच्या तसे रेखाटून आपली चित्रकलेची कला जोपासली आहे.तिने अनेक महापुरुषांची व नैसर्गिक चित्रे काढून संग्रही ठेवली असून ही कला वाढविण्याचा मनोदय व्यक्त केला आहे याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता तिने जि प शाळा पिलीव,विद्यालय व ज्युनियर कॉलेज पिलीव ,क.भा.पा. महाविद्यालय व कमवा शिका योजना पंढरपूर मधील माझ्या सर्व शिक्षक शिक्षिका यांचे मार्गदर्शनातून व माझ्या परिवाराच्या प्रोत्साहनाने ही कला जोपासत असल्याचे सांगितले.वक्तृत्वाप्रमाणेच चित्रकला व काढलेले शिवछत्रपतींचे चित्र पाहून अनेक शिवभक्तांनी व मान्यवरांनी कौतुक करत अभिनंदन केले.