विठुरायाच्या पंढरीत खंडागळे परिवार देताहेत बालकांना संस्कृतीचे धडे
पिलीव प्रतिनिधी : महाराष्ट्राची संस्कृती पंढरपुरात पाहायला मिळते हे आपण ऐकून आहोतच. त्याचप्रमाणे खंडागळे परिवाराकडे पाहिलं तर संपूर्ण परिवाराच संतांच्या भूमीत धार्मिकतेचे पालन करून वारकरी संप्रदायाचा वारसा घेऊन मेवा मिठाईचा व्यवसाय करत विठ्ठल मंदिराचे पायथ्याशी पिढीजात संस्कृती प्रिय म्हणून सेवा देत असतात. सोबतच आपल्या भावी पिढीने भारतीय संस्कृती जोपासावी म्हणून धार्मिक सण,राष्ट्रीय सण, ऐतिहासिक प्रसंग यांची माहिती देऊन शैक्षणिक गुणवत्ता ही जोपासली आहे प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, शिवजयंती यासारख्या कार्यक्रमांचे परिवारामध्ये आयोजन करून त्यांच्या परिवारातील बाल कलाकारांनी दख्खनचा राजा जोतिबा, शिवजयंती हे उत्सव अनिरुद्ध खंडागळे, वेदांत खंडागळे, वरूण खंडागळे,तनश्री खंडागळे यांनी प्रात्यक्षिक करून वेशभूषेसह साजरा केल्याचे पाहून मनस्वी आनंद वाटतो. याबाबत वरील बालकलाकारांना दीपाली खंडागळे,सागर खंडागळे, अश्विनी खंडागळे,नेहा खंडागळे यांचे सर्व प्रकारचे प्रोत्साहन व मार्गदर्शन असते. त्यामुळे या सर्व परिवाराचे कौतुक होत आहे.