बारामती येथील नूतन सभापती आशा माने यांचा निमगाव (म) येथे यथोचित सन्मान.. !

पिलीव/प्रतिनिधी
बारामती नगर परिषदेच्या नूतन महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी आशा दत्तू माने यांची निवड झाल्याबद्दल माळशिरस तालुक्यातील निमगाव (म) येथील माने कुटुंबीयांचे स्नेही मगर कुटुंबियांच्या वतीने नुतन महिला व बालकल्याण सभापती आशा माने यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी पै.प्रमोद मगर,पै.सचिन मगर,माजी सरपंच दत्तु माने,प्रविण माने,प्रताप (आबा) पागळे आदी मान्यवर उपस्थित होते.बारामती नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या निवडी तहसीलदार विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच संपन्न झाले असून या निवडीवेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव ,ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर मुख्याधिकारी किरणराज यादव यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते बारामती नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे यावेळी विविध विषय समित्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या स्थायी समितीसाठी पौर्णिमा तावरे ,सचिन सातव, किरण गुजर, कमल कोकरे यांच्यासह सर्व समित्यांचे सभापती असतील सार्वजनिक बांधकाम विभाग समिती सभापतीपदी सत्यव्रत काळे, स्वच्छता बैठक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती पदी सुरज सातव, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी रमेश भोकरे ,शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापतीपदी बेबी मरियम बागवान तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी आशा माने तर उपसभापतीपदी ज्योती सरोदे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *