पिलीव येथील प्रशांत गांधी यांची सन्मती सेवा दलाच्या सहसचिव पदी निवड.. !
पिलीव/प्रतिनिधी
सन्मती सेवादलाच्या नूतन अध्यक्षपदी सदाशिवनगर येथील श्री.विरकुमार अनंतलाल दोशी,उपाध्यक्ष महावीर शिरीष दोशी नातेपुते, सचिव हितेश नंदकुमार दोशी टेंभुर्णी,सहसचिव प्रशांत चंद्रकांत गांधी पिलीव ,खजिनदार केतन राजकुमार दोशी अकलूज,सहखजिनदार विक्रांत रवींद्र गांधी जेऊर,प्रसिद्धीप्रमुख रोहन सुरेश गिल्डा अकलूज,सहप्रसिद्धीप्रमुखअमोल श्रीकांत दोशी मुंबई अशा प्रकारे वरील निवडी करण्यात आल्या १८ फेब्रुवारी रोजी श्री सन्मती सेवा दलाचे मा.अध्यक्ष जिनेंद्र दोशी यांचे निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीत सदरच्या निवडी करण्यात आल्या असल्याचे प्रशांत गांधी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.यावेळी श्री सन्मती सेवा दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. विकास शहा, वालचंदनगर ,संस्थापक – अध्यक्ष श्री मिहीर बाहुबली गांधी, सर्व माजी अध्यक्ष, जिनेंद्र जयकुमार दोशी, बोंडले,महावीर विजयकुमार शहा, श्रीपूर, प्रितम कांतीलाल कोठारी, फलटण,नवजीवन धन्यकुमार दोशी, वेळापूर,डाॅ. राजेश जयंतीलाल शहा, म्हसवड,मयुर राजकुमार गांधी, अकलूज, विद्यमान अध्यक्ष, संदेश रविंद्र गांधी, भिमानगर व पदाधिकारी, संचालक हे उपस्थित होते. यावेळेस मागील वर्षात झालेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला आगामी वर्षात आपणा समोर असलेली आव्हाने याबद्दल डॉ. विकास शहा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.