पिलीव येथे साधेपणाने परंतु मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी.. !

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव लक्षात घेवून साधेपणाने परंतु मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धनचे माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार यांच्या शुभाहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करुन श्रीफळ वाढविण्यात आले.सदर प्रसंगी जि.प सदस्य गणेश पाटील, पिलीवचे उपसरपंच संजय आर्वे, डॉ दिलीप पवार,चेअरमन अविनाश जेऊरकर ,उमेश देशमुख,ॲड मानसिह जहागीरदार, राजेंद्र लोखंडे, सचिन मदने, युवा उदयोजक राहुल मदने ,समशेरसिंग रजपूत, तानाजी लोखंडे ,जवाहरलाल विदयालयाचे माजी मुख्याध्यापक शिंदे सर,मोहसीन शेख ,सर्व पत्रकार बंधू यांच्यासह अनेक शिवभक्तांनी अभिवादन केले.तसेच पिलीव ग्रामपंचायत कार्यालय याठिकाणी ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपसरपंच संजय आर्वे व मान्य वरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करुन अभिवादन करण्यात आले.तर पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विदयालय,जि.प सर्व शाळा याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.