वेळापूर येथील सुशिला सरतापे यांचे निधन
पिलीव/प्रतिनिधी
आरपीआय आठवले माळशिरस तालुका सरचिटणीस मिलिंदराव सरतापे यांच्या मातोश्री सुशीला वाल्मिक सरतापे वय७० यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे वेळापूर येथे त्यांच्यावर बौद्ध पध्दतीने रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी माळशिरस तालुक्यातील सर्व स्तरातील मान्यवर नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते सुशीला सरतापे या मनमिळाऊ स्वभाव व आंबेडकरी चळवळीतील एक सुसंस्कारित आदर्श कार्यकर्ते म्हणून तालुक्यात नावलौकिक असलेले सरचिटणीस मिलिंदराव सरतापे यांना घडविण्यात त्यांचा मोठा वाटा होता अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले कुटुंब प्रगतीपथावर आणले त्यांच्या निधनाने सरतापे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात मुले सुना नातवंडे असा परिवार आहे