पिलीव घाटात एका अविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..!

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव घाटात सुळेवाडी गावच्या हद्दीत उंबरे वेळापूर येथील अविवाहित तरुण गणेश रमेश गुंड (वय-२१) याने अज्ञात कारणाने फॉरेस्ट मधील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.मयत गणेश गुंड याला वारंवार घरातून पैसे घेऊन 20-20 दिवस निघून जाण्याची सवय होती व तो परत घरी यायचा म्हणून आम्ही मीसींगची तक्रार कधीच पोलीसात दिली नव्हती आशी माहिती मयताचे वडिल रमेश नामदेव गुंड यांनी पिलीव पोलीस स्टेशनला खबर देताना दिली आहे.मयत गणेश गुंड हा होंडा कंपनीनांच्या शाईन मोटारसाकलवरून घटनास्थळी आला आसल्याने मोटारसाकलवरील नंबर वरुन अकलुज RTO ला संपर्क साधले नंतर सदरची व्यक्ती गणेश रमेश गुंड असल्याचे निष्पन्न झाले.त्यावरुन त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना सदर घटनेची माहिती दिल्याने नातेवाईकांना मयताची ओळख पटली व पोलीस स्टेशनला खबर दिली असून माझी कोणाविरूध्द तक्रार नसल्याचे मयताच्या वडीलांनी खबरीत सांगितले आहे.सदर घटनेचा पोलीस निरिक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ पंडित मिसाळ,सतीश धुमाळ,बापू कोकाटे यांनी रितसर पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी पाठवून दिले.पुढील तपास पोहेकॉ पंडित मिसाळ हे करित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *