पिलीव गावचे सुपुत्र नितीन भगवानराव सातपुते यांचा सातासमुद्र पार सन्मान.. !
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील सेवानिवृत्त उप आयुक्त भगवानराव आण्णा सातपुते यांचे सुपुत्र नितीन भगवानराव सातपुते हे गेली १५ वर्षापासून लंडन येथे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत.या १५ वर्षामध्ये त्यांच्या कामाची चिकाटी,जिद्द,प्रामाणिकपणा,वक्तशीरपणा व अशा अनेक गोष्टी पाहून नितीन सातपुते यांना त्यांच्या उल्लेखनीय कामाची पोचपावती म्हणून त्यांचा लंडनमध्ये एका नामांकित कंपनीकडून यथोचित सन्मान करण्यात आला आहे.नितीन सातपुते यांचे वडील भगवानराव सातपुते यांनी अतिशय खडतर प्रवास करुन उच्च शिक्षण घेतले व त्यांनी आपल्या बुध्दीच्या व मेहनतीच्या जोरावर तहसिलदार,उपजिल्हाधिकारी व उप आयुक्त पदा पर्यंत मजली मारली.त्यांची मोठी मुलगी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर तर लहान मुलगी इलेक्ट्रिकल इंजिनियर असून लहान जावई बी.आर ठोकळे हे मुंबई येथे सुपरीटेंडींग इंजिनियर आहेत.गेल्या काही दिवसांपुर्वीच त्यांच्या प्रामाणिक कार्याची दखल घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सिने अभिनेते अमिताभ बच्चन,महाराष्ट्र पोलिस महासंचालक संजय बर्वे साहेब व इतर प्रतिष्ठित मान्यवरांच्या शुभहस्ते बी.आर ठोकळे यांचाही मुंबईमध्ये प्रशस्ती पत्र देवून यथोचित सन्मान करण्यात आला होता.अशा प्रकारे आपल्या जिवनातील खडतर प्रवास केवळ आणि केवळ आपल्या बुध्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर सर करून भगवानराव सातपुते यांनी आपले कुटुंब सक्षम बनविले असल्याचे पहावयास मिळत असून सध्या ते सातारा येथे वास्तव्यास आहेत.त्यांच्या या साक्षर व विकसित कुटुंबाकडे पाहून त्यांचे विविध स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे.