मारकड-पाटील व पांढरे-पाटील यांनी विवाह समारंभातून दिला वृक्षारोपणाचा संदेश

पिलीव प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील पाटबंधारे विभागातील अभियंता विजयकुमार मारकड पाटील व सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याच्या संचालिका उषाताई विजय मारकड पाटील यांचे सुपुत्र व गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर चिरंजीव सौरभ व करमाळा तालुक्यातील मकाई साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब पांढरे पाटील यांची पुतणी चि सौ का शितल यांच्या विवाहाचे आयोजन बारामतीमधील चिराग गार्डन येथे सद्गुरु श्री श्री साखर कारखाना लिमिटेड राजेवाडी श्रीश्रीनगर चे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील व नारकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर पाटील यांचे उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली सोशल डिस्टंसिंग चे पालन करत भ‌व्य दिव्य स्वरुपात करण्यात आले होते. विवाह समारंभाच्या वेळी वधू-वरांना ऐतिहासिक पद्धतीने डोलीद्वारे व भगव्या ध्वजाच्या रांगेत सनई चौघड्याच्या निनादाने ऐतिहासिक विद्युत रोषणाई ने सजवलेल्या मंडपामध्ये वधूवरांना स्थानापन्न करण्यात आले. सदर प्रसंगी उपस्थितांना स्वागत कमानीतच एक एक वृक्ष भेट देऊन तो जोपासण्याचा संदेश दिला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी पणन मंत्री हर्षवर्धन पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या स्नुषा, सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन एन. शेषागिरी राव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील,यू एल ग्रुपचे उदय जाधव, टी अँड टी ग्रुप चे महालिंग तांदुळकर, मकाई साखर कारखान्याचे चेअरमन प्रिन्स दिग्विजय बागल , घुमरे सर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक, साधक,तसेच शासकीय, निमशासकीय,राजकीय, सामाजिक व सर्व क्षेत्रातील अधिकारी,पदाधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थिती लावून या आगळ्या वेगळ्या विवाह समारंभाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *