पिलीव येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर विद्यालय तंबाखूमुक्त घोषित – साहेबराव लेंडवे..!
पिलीव/प्रतिनिधी
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यशासन आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा व महाविद्यालये तंबाखूमुक्त करण्याची मोहीम सध्या जोमाने सुरू आहे.देशाचा आधारस्तंभ असणारे विद्यार्थी निर्व्यसनी असणे सर्वांच्याच हिताचे आहे. हे लक्षात घेऊन विद्यालयाचे मुख्याध्यापक साहेबराव लेंडवे यांनी आपले विद्यालय तंबाखूमुक्त करण्याचे ठरवले.जि.प.सोलापुर शिक्षण विभाग व सलाम मुंबई फाऊंडेशनचे सोलापुर जिल्हा समन्वयक सौ.शुभांगी लाड यांच्या मार्गदर्शनातून नियमांचे काटेकोर पालन करून माळशिरस तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्यालय व रमेश खलिपे ज्यू.कॉलेज पिलीव मध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त उपक्रमाबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच त्यांचा सक्रीय सहभाग घेण्यात आला. त्याचा अत्यंत चांगला परिणाम दिसून आला. सर्व निकषांचे काटेकोर परीक्षण करून मुंबई फाउंडेशन ने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिलीव हे तंबाखूमुक्त शाळा म्हणून घोषित करून प्रमाणपत्र दिले.त्यामुळे पिलीव पंचक्रोशीत विद्यालयाचे संस्थेतील पदाधिकाऱ्यांकडून ,गटशिक्षणाधिकारी,विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख श्री.फासे सर, पालक व पंचक्रोशीकडून भरभरून कौतुक होत आहे.
या उपक्रमासाठी नोडल टीचर म्हणून श्री दिपक माने यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी मुख्याध्यापक साहेबराव लेंडवे व पर्यवेक्षक मधुकर गायकवाड यांच्या मदतीने तंबाखूमुक्तीसाठी नियोजन व कार्यवाही केली. त्यासाठी , मीनल घोडके ,राजेश्वर झाडे , रुक्मिणी जरे , प्रकाश जाधव , नितीन माने, गौरीशंकर बेसिकराव यासह सर्व सेवकांनी निकष पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतले.आपले विद्यालय कायमचे तंबाखूमुक्त ठेवण्याचा संकल्प केला. मा मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांनी सर्व सेवकवर्गाचे अभिनंदन करून आभार मानले.