माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त माळीनगर ग्रामपंचयातमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन
माळीनगर/उल्हास चंदनशिवे
माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने माळीनगर ग्रामपंचायतीच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अपंगांना अनुदान वाटप वृक्षारोपण फुले-आंबेडकर गुणवंत विद्यार्थी पुरस्कार आंबेडकरी शाहीर यांचा सन्मान करण्यात आला.रमा माता कॉलनी येथील असेसमेंट उतारा चे वाटप दि सासवड माळी शुगर फॅक्टरी चे एम-डी रंजन भाऊ गिरमे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अभिमान जगताप हे होते.प्रमुख पाहुणे शिरीष फडे उपसरपंच नागेशतुप सौंदर्य माजी पंचायत समिती सदस्य सुशांत जगताप ग्रामपंचायत सदस्य संग्राम भोसले अनिता कांबळे अलका तावरे नीलेश एकतपुरे विराज निंबाळकर विकास कांबळे गायक नाईकनवरे अजित नाईक नवरे लायक सय्यद जबर तांबोळी व्यापारी मित्रमंडळाचे अध्यक्ष रिंकू राऊत संजय दळवी प्रकाश कांबळे आदी सूत्रसंचालन भीमराव चंदनशिववे मेंबर यांनी तर आभार प्रदर्शन महादेव बनकर यांनी केले.