सदगुरु साखर कारखाना शेतकऱ्यांच्या उसाचे कांडेना कांडे गाळप करणार : शेतकऱ्यांना दिलासा.. !

पिलीव/प्रतिनिधी
सद्गुरु साखर कारखान्यास गेली ९ वर्षे सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऊस पाठवून मोलाचे सहकार्य केले आहे. त्याबद्दल चेअरमन एन. शेषागिरी राव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील व सर्व संचालक मंडळाने शेतकरी बांधवांना धन्यवाद दिले. यासंदर्भात बोलताना चेअरमन एन शेशागिरी राव व व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर-पाटील , केन मॅनेजर सुनील सावंत यांनी सांगितले की सध्या उन्हाळा सुरु झाल्यामुळे आपला ऊस जाईल की नाही अशी चिंता अनेक शेतकऱ्यांना लागून राहिली असली तरीही आपला सद्गुरु साखर कारखाना सर्व शेतकऱ्यांची चिंता मिटवण्यासाठी कटिबद्ध असून शेतकरी बांधवांच्या शेतातील उसाचे कांडे सुद्धा शिल्लक राहू न देता कोणत्याही भागातील ऊस नेण्यास आमची यंत्रणा राबवत आहे.चालू २०२०-२१ हंगामामध्ये प्रोग्रॅम नुसार आतापर्यंत कारखान्याने ४ लाख ३० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून उर्वरित उसाचेही १५ एप्रिल २०२१ , पर्यंत गाळप करण्यात येणार आहे.त्यामुळे सर्व नोंदणी केलेल्या शेतकरी ऊस उत्पादकांनी आपला ऊस पाठवून चिंतामुक्त राहण्या
ची ग्वाही दिली आहे.तरी ज्याचा ऊस येणार आहे त्यांनी ज्या त्या आमचे विभागीय कार्यालयात ऊसाच्या नोंदी कराव्यात.आपल्या कारखान्याने वेळच्यावेळी शेतकऱ्यांची बिले अदा करण्यात व वजन काटा तंतोतंत प्रामाणिकपणे ठेवल्याचा अनुभव शेतकरीवर्गाला आहेच. याचीही आठवण करून दिली.यापुढेही कारखान्याचा कारभार पारदर्शी व स्वच्छ प्रतिमेचा राहणार असल्याचे चेअरमन,व्हाईस चेहरा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *