पिलीव येथील शेतकऱ्यांने भरले २लाख वीज बिल : महावितरण च्या कृषी वीजबिल सवलत योजनेला प्रतिसाद

पिलीव प्रतिनिधी

शेती आणि वीज हे एक अतूट नाते आहे.शेती करण्यासाठी विजेची गरज असते.म्हणून महावितरण कंपनी कडून शेतकऱ्यांना अखंडपणे वीज पुरवठा देणे आणि इतर विजेची कामे होण्यासाठी शेती पंप च्या वीज बिलाची थकीत रक्कम वसूल करणे चालू असून शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही योजना असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली थकीत कृषी वीज बिले भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरण पिलीव शाखा चे सहाय्यक अभियंता शरद मिसाळ यांनी केले आहे.

गुरुवारी पिलीव येथील प्रगतशील बागायतदार, वीजग्राहक आनंदराव बाबुराव जाधव यांनी आपली एकूण 7 बिलाची 2 लाख 16 हजार रुपये भरून या योजनेत सहभाग घेतला आहे.महावितरण पिलीव शाखा कार्यालयाच्या अंतर्गत एकूण 13 गावे असून कृषी पंप चे 5531 वीजग्राहक आहेत.यांची एकूण 70.93 कोटी थकीत वीजबिले असून मिळणाऱ्या लाभाची रक्कम 26 कोटी1लाख 64हजार रु आहे. या योजनेची माहिती सर्व कर्मचारी शेतकऱ्यांना भेटून देत असून यासंदर्भात शंका असल्यास शाखा कार्यालयात भेट द्यावी असे सहाय्यक अभियंता श्री शरद मिसाळ यांनी सांगितले.

चौकट-

आम्ही नियमीत वीज बिले भरत असतो आतापर्यंत आम्हाला कुठलीही सवलत मिळाली नाही.शासनाने थकीत बिले भरण्यासाठी योजना काढण्यात पेक्षां नियमित वीज बिले भरण्यासाठी योजना काढून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे.
श्री आनंदराव जाधव,शेतकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *