के के पाटील यांची भाजपाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणीवर निवड

पिलीव प्रतिनिधी –

माळशिरस तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी पं स सदस्य के के पाटील यांची महाराष्ट्र राज्य कार्यकारणीवर निमंत्रकपदी तसेच सोलापूर जिल्ह्याच्या सहप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नुकतेच त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे.माळशिरस तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून अनेक सामाजिक, राजकीय व लोकापयोगी कामे ते करीत आहेत.कुस्ती स्पर्धा,रोजगार मेळावे तसेच नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी काळात त्यांनी पुरग्रस्त नागरिकांना फार मोठी मदत केली होती.जीवनावश्यक वस्तू तसेच इतर साहीत्याचे मोठ्या प्रमाणावर त्यांनी गोरगरिबांना गावोगावी जाऊन केले होते.गत विधानसभा निवडणुकीत तालुक्यात मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या परंतु के के पाटील यांनी ठामपणे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करुन राम सातपुते यांना विजयी केले यामध्ये के के पाटील यांचा सिहाचा वाटा होता .याची पक्षाने दखल घेत त्यांना महाराष्ट्र तसेच जिल्हा कार्यकारणीवर काम करण्याची संधी दिली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ राम सातपुते, श्रीकांत भारती,जिल्हा परिषद सदस्या ज्योती पाटील यांच्या सह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्य वर यांच्या कडुन त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *