गिरवी ता.माळशिरस येथिल 23 लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी गायरणातील प्रत्येकी 500 चौरस फूट जागा मंजूर – वैभव गिते
एन.डी.एम.जे च्या आंदोलनाचे भव्य-दिव्य यश – विकास दादा धाइंजे
पिलीव/प्रतिनिधी
घरकुल बांधण्यासाठी गायरान जागा मिळावी म्हणून गटविकास अधिकारी माळशिरस यांनी तहसीलदार माळशिरस यांना प्रस्ताव पाठवला आहे.
मौजे गिरवी ता.माळशिरस जि.सोलापूर येथील एकूण 23 सर्व जाती-धर्मांच्या लाभार्थ्यांना शासकीय जमीन मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे.तहसीलदार यांना भेटून गायरान मध्ये घरकुल बांधण्यासाठी 23 लाभार्थ्यांची मंजुरी घेतली आहे.
यासाठी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास दादा धाइंजे यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तहसील कार्यालयावर तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आली होती एनडीए म्हणजे चे राज्य सचिव वैभव गीते यांनी माळशिरस तहसील कार्यालयावर घरकुले बांधण्याचा इशारा दिला होता. यानंतर माळशिरस तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी घरकुलांना शासकीय जागा देण्याच्या हालचाली वाढवल्या आहेत. अशी माहिती राष्ट्रीय दलित न्याय आंदोलनाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय झेंडे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव बाबासाहेब सोनवणे यांनी दिली आहे.