संग्रामसिंह जहागिरदार यांच्या शुभाहस्ते विविध विकास कामाचा भूमिपूजनाने प्रारंभ.. !
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव ग्रामपंचायतीच्या प्रारुप आराखड्यातील केंद्राच्या चौदाव्या वित्त आयोगातील विविध विकास कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते कोरोनाच्या पार्शवभूमिवर साधेपणाने करण्यात आले व कामाला प्रारंभ करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बाजार तळावर कट्टा बांधणे ,प्रत्येक वार्डात बंदिस्त गटारी केंद्र शाळेच्या शाळा खोल्यांची दुरुस्ती , सर्व आंगणवाड्याना संरक्षक भिंती, गोडसे वस्ती पिलीव रस्ता, मुस्लिम दफनभूमीमध्ये आजान शेड, गटारी दुरुस्ती रस्ते शौचालय दुरुस्ती ,पडळकर वस्ती ते महालक्ष्मी मंदिर रस्ता महावीर मेडिकल घाटे रस्ता ,देशमुख धोत्रे काळे पवार सातपुते वस्ती पर्यंत बंदिस्त गटारी,पिलीव ते जामदार हात्तीबुडी तलाव रस्ता सर्व नवीन रस्ते सिमेंटीकरण करण्यात येणार आहेत तर सर्व गटारी बंदिस्त करण्यात येणार आहेत, आदि कामांचे भूमिपूजन आमचा गाव आमचा विकास या तालुका स्तरीय समितीने 14 व्या केंद्रीय वित्त आयोग पंचायत समिती माळशिरस 2019- 2020 या बेसिक ग्रँट निधीमधून ग्रामपंचायत पिलीव ग्रामसभा ठरावानुसार मंजुरी मिळालेप्रमाणे व पंचायत समिती माळशिरस यांचेकडील दिनांक 10:08 2017 च्या मंजुरी प्रमाणे अटी एक ते दहा शर्ती नुसार सुचित करून मंजुरी मिळाली वरुन।एकूण 42 लाख रुपये निधी मंजुरीझाले प्रमाणे कामास प्रत्यक्ष टेंडर प्रमाणे सुरुवात करण्यात आली आहे. सदरच्या सर्व विविध कामाचा भूमिपूजन समारंभ माजी सभापती संग्रामसिंह जहागिरदार, जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील,सरपंच नितीन माळी, उपसरपंच संजय आर्वे ,ग्रामविकास अधिकारी अनिल सावळजकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत कामास प्रारंभ करण्यात आला यावेळी सौ सुषमा जामदार, अविनाश जेऊरकर जीवन गुरव,राजेंद्रसिंग जामदार,संतोष बगाडे चंद्रकांत माळी ,दादासाहेब देशमुख ,विजयसिंग राजपूत दत्तात्रय बोडरे रामचंद्र माळी ,समशेरसिंग रजपूत ,मोहसिन शेख ,सुरज जामदार ,संतोष पडळकर प्रवीण वाघमारे सौ छाया माळी ,सौ शालन खुर्द प्रवीण वाघमारे, महेश वाघमारे विजय सगरे, नुरमहमद पठाण ,शशी पवार अरुणसिंग जामदार ठेकेदार खताळ ,बाळू करडे ,कोंडीबा करडे ,केंद्रप्रमुख राजकुमार फासे ,मुख्याध्यापक नागनाथ कलढोणे,शिक्षकवर्ग,ग्रामपंचायत, कर्मचारी सोमनाथ देशमुख, विजय देशमुख ,एस आर महामुनी,रामचंद्र मदने व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.