अकलुज प्रांतकार्यालयासमोर किसान बाग आंदोलन.. !
माळीनगर/उल्हास चंदनशिवे
वंचित बहुजन आघाडी माढा लोकसभा यांच्यावतीने मुस्लिम समाज बांधवाच्या पुढाकाराने दिल्लीमध्ये चाललेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान बाग आंदोलनाचे आयोजन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी केले होते आंदोलनामध्ये पंजाब शेतकऱ्यांनी मुस्लिमांच्या शाहीन बाग आंदोलनास लंगर आंदोलन करून मुस्लिम समाजाला समर्थन केले होते त्याच धर्तीवर मुस्लिम समाजाने वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून शेतकरी विरोधात कृषी कायदे केंद्र सरकारने केलेले रद्द करण्याबाबत बाळासाहेबांच्या आदेशानुसार जिल्हा कलेक्टर ऑफिस प्रांत कार्यालय यावर धरणे आंदोलन आज रोजी २७ जाने ला प्रांत कार्यालय माळशिरस विभाग अकलूज येथे संपन्न झाले माढा लोकसभेचे जिल्हा कोषाध्यक्ष अभिमान जगताप ‘ जि उपाध्यक्ष सुभाष ओव्हाळजिल्हा महासचिव विशाल नवगिरे ‘सिद्धार्थ कांबळे कल्याण लांडगे . मुस्लिम समाजाचे जुबेर सय्यद विजयभाऊ बनसोडे विनायक सावंत सुशांत जगताप माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंग भोसले दत्तात्रय जानराव अभिजीत गायकवाड सलीम तांबोळी / नवनाथ गाडे ‘ भीमराव चंदनशिवे अजित नाईक नवरे ,बलभीम नाईक नवरे प्रवीण वाघमारे आदी कार्यकर्ते मुस्लिम बांधव यांनी धरणे आंदोलनामध्ये सहभागी होते यावेळी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले .