पिलीव येथे ह.भ.प. हरिहरनंदन महाराजांचे हस्ते “जाधव मेडिकल्स”चे शास्त्रोक्त पद्धतीने उद्धघाटन
पिलीव प्रतिनिधी : पिलीव ता. माळशिरस येथे एसटी स्टँड नजीक पडळकर कॉम्प्लेक्समध्ये पिलीव परिसरातील खेड्यातील सर्व रुग्णांच्या सेवेसाठी शिंगोर्णी येथील युवक औषध निर्माते प्रकाश अनिल जाधव ( बी.फार्मसी) यांनी नोकरीच्या मागे न लागता “जाधव मेडिकल्स” या नावे मेडिकल व जनरल स्टोअर्स थाटले असून सदर मेडिकल्स व जनरल स्टोअर्सचे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा विधी करून पिलीव व भागाचे श्रद्धास्थान ह.भ.प. हरिहरनंदन महाराजांचे हस्ते व परिसरातील राजकीय,सामाजिक,औद्योगिक क्षेत्रातील, आरोग्य विभागातील व मित्रमंडळी, स्नेही,आप्तेष्ट व सर्व घटकातील मान्यवरांच्या आणि पत्रकारांच्या उपस्थित सोशल डिस्टंसिंगचे पालन करत उत्साहाच्या वातावरणात उद्घाटन केले. सदर उद्घाटन प्रसंगी सदिच्छा भेटीत ह.भ.प. हरिहरनंदनबाबां सहित सर्व घटकातील मान्यवरांनी शुभ संदेश देऊन दुकानाचे मध्यवर्ती ठिकाण, फर्निचर ,औषध मांडणी याबाबत कौतुक करून व्यवसायाच्या भरभराटीसाठी प्रकाश जाधव यांना सुयश मिळो असे आशीर्वाद दिले.
