सदगुरु श्री श्री साखर कारखान्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न

पिलीव/रघूनाथ देवकर
सांगली-सातारा-सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यात आजमितीला शेतकऱ्यांच्या हृदयसिंहासनावर आत्मविश्वास संपादित केलेल्या सदगुरु श्री श्री साखर कारखान्यात भारताच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम पिलीव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्या हस्ते कारखान्याचे चेअरमन एन शेशागिरी राव,व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, जनरल मॅनेजर मोहन लाल पाल, संचालक सतीश दडस,रघुनंदन रेड्डी ,जे.जे.पाटील यांचे समवेत ध्वज पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ करुन ध्वजारोहणाने कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर सदर प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सदर प्रसंगी संचालक सतीश दडस, व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील , शशिकांत शेळके व एन.शेषागिरीराव यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणांतून देश प्रेमाविषयी व आप-आपल्या कार्यामध्ये एकनिष्ठ राहून सेवा करण्याचे संदेश दिले. सदर कार्यक्रमाचे आयोजन एच आर व एडमिन मॅनेजर समीर सय्यद यांनी केले होते.सदर कार्यक्रमास डीजीएम शहाजी पाटील,तानाजी देवकाते, अवधूत जमदाडे, सचिन खटके,केन मॅनेजर सुनील सावंत,शरद देवकर, सुरक्षा अधिकारी श्री बोडरे उपस्थित होते.आभार नागेश शिरकांडे सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *