जातपडताळणी समितीचा इच्छुक उमेदवारांना दिलासा – जगदीश निंबाळकर
पिलीव/सुजित सातपुते
राखीव उमेदवारांसाठी जात पडताळणीची ऑनलाइन पोहच व १५ नंबर फॉर्म चालत असून सोलापूरला पोच घेण्यासाठी जाण्याची गरज नाही असे नायब तहसीलदार यांच्याकडून सांगण्यात आले असल्याचे इच्छुक उमेदवार बोलत होते.परंतु फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये निवडणूक आयोगाचे पत्र आले आणि त्या पत्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले होते की जात पडताळणीचा प्रस्ताव दाखल केल्याची पोहोचपावती आवश्यक आहे.असे असल्याने पोहच पावती सोलापूर वरून घेऊन येणे अनेक इच्छुक उमेदवारांना शक्यच नव्हते त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणूकीत उतरणार्या अनेक उमेदवारांच्या पुढे एक आवाहन उभे राहीले होते.परंतु त्या आवाहनाला जातपडताळणी समिती कार्यालयाकडूनच बगल मिळाली आहे.जातपडताळणी समितीचे कार्यालय आज रात्रभर व उद्या दुपारी 3.00 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे माळशिरस तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसिलदार जगदीश निंबाळकर यांनी माळशिरस टाईम्सशी बोलताना सांगितले.त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा आनंद द्विगणित झाला असल्याचे पहावयास मिळत आहे.