वसुंधरा अभियानासाठी माळीनगर ग्रामपंचायतची निवड..!

माळीनगर/उल्लास चंदनशिवे
महाराष्ट्र शासनाच्या वतीने वातावरणातील बदल व पर्यावरण यासाठी माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे.अभियानासाठी माळशिरस तालुक्यातील चार ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली असून यामध्ये माळीनगर ग्रामपंचायतीचा समावेश असल्याची माहिती विद्यमान सरपंच आभिमान जगताप व ग्रामविकास अधिकारी एस जे.रकटे यांनी दिली.दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली माळीनगर ग्रामपंचायतीने विविध प्रकारची कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली असून आता या अभियानाची ही भर पडली आहे 31 मार्चपर्यंत हे अभियान राबविले जाणार आहे.जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे जनसामान्यात पर्यावरणाचे महत्व पटवून देवून हे अभियान राबविले जाणार आहे.जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे जनसामान्यात पर्यावरणाचे महत्त्व बिंबवण्यासाठी यामध्ये प्रयत्न केले जाणार असून विविध बाबींसाठी गुण दिले जाणार असल्याचे सरपंच जगताप यांनी सांगितले यावेळी उपसरपंच संग्राम भोसले सदस्य भीमराव चंदनशिवे सारिका एकतपुरे अनिता कांबळे अलका तावरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *