कुसमोड येथे अज्ञात व्यक्तीने उसावर मारले राऊंड अप : दोन महिन्याचा दीड एकर ऊस जळून खाक.. !
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव (विठ्ठलवाडी) येथील सामान्य शेतकरी भिमराव दशरथ खरात यांचे कुसमोड येथे वडिलोपार्जित तीन एकर क्षेत्र आहे.त्या शेतावरच भिमराव खरात हे आपली उपजीविका चालवतात.परंतु गेल्या काही दिवसापासून भिमराव खरात यांच्यावर अज्ञात व्यक्तीने खुन्नस धरून त्यांचे वारंवार नुकसान करण्याचा जणू विडाच उचलला आहे की काय ? कधी मोटार चोरीला जाते,कधी स्टाटर कधी,कधी ॲटो,कधी केबल तर कधी पाण्याचे चेंबर फोडले जातात हा त्रास खरात यांना अनेक दिवसांपासून चालू आहे.गेल्या महिन्यातच त्यांच्या विहीरीवरील मोटार चोरीला गेली असल्याची त्यांनी पिलीव औट पोस्टला तक्रार नोंदवली आहे.
तर लागलीच १५ दिवसांपूर्वी स्टाटर,ॲटो व केबल चोरीला गेली असल्याचे खरात यांनी सांगितले.आणि आज तर चक्क दोन महिन्यापूर्वी व्याजाने पैसे काढून लागण केलेल्या दीड एकर उसावर अज्ञात व्यक्तीने राऊंड अप मारले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे.राऊंड अप मारल्याने दीड एकर क्षेत्रामध्ये असलेला दोन महिन्यापूर्वी लागण केलेला ऊस जळून खाक झाला असून भिमराव खरात हे अतिशय हवालदिल झाले आहेत. व्याजाने पैसे काढून मी शेतीची मशागत करुन कशीतरी दिड एकर उसाची लागण केली होती परंतु त्याचे आज्ञात व्यक्तीने अतोनात नुकसान केले असून वारंवार माझ्या शेतातील पिकांचे व साहीत्यांचे नुकसान व तोडफोड होत आहे.तरी त्या अज्ञाताचा पिलीव औट पोस्टचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके यांनी तपास लावून त्याच्यावर कठोर कारवाई करावी असे भिमराव खरात यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.