निमगाव मध्ये गुरुवर्य कै.धनंजयराव इनामदार यांची १०० वी जयंती साजरी..!


पिलीव /प्रतिनिधी
जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित निमगाव विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज निमगाव येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य कै. धनंजयराव इनामदार यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले तसेच जन्मशताब्दी वर्ष 2020 2021 प्रारंभ करण्यात आला यानिमित्त संस्थेमध्ये वर्षांमध्ये विविध शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात येतील अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीनिवास इनामदार यांनी दिली,

याप्रसंगी प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच अभिवादन करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीनिवास इनामदार संस्थेचे उपाध्यक्ष श्री महादेवनाना मगर, संस्थेच्या सचिव श्रीमती स्वयंप्रभा इनामदार सहसचिव श्री बबनराव जाधव, निमगाव चे माजी सरपंच व संचालक श्री हनुमंतराव पवार , संचालक श्री संभाजीराव मगर,सुश्रीया इनामदार ,प्राचार्य भीमराव जाधव पर्यवेक्षक मोहन देशमुख ,आदर्श प्राथमिक विद्यालय निमगाव चे मुख्याध्यापक प्रा सचिन मगर, प्रा चिंतामणी मगर ,सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर स्टाफ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *