होमगार्ड नरेंद्र पाटोळे व सागर पवार यांची कौतुकास्पद कामगिरी : ATM मशीन फोडणार्यास पाठलाग करुन पकडले..!
पिलीव/प्रतिनिधी
दिनांक 19/12/2020 च्या पहाटे 2:45 ला पोलीस स्टेशनला फोन आला की यशवंनगर येथील इंडिकॅश एटीएम कोणीतरी हातोडीने फोडत आहे. त्यानंतर ठाणे अंमलदार यांनी पेट्रोलियम करणार्या गाडीला पोलीस स्टेशन मधून माहिती कळवली व लगेच राऊंड ला गाडी असताना पंधरा मिनिटात घटनास्थळी पोहोचली व इतर कर्मचाऱ्यांना पण त्या ठिकाणी यायला सांगितले.त्यानंतर आम्हीं सर्वांनी एटीएम ला गोल गराडा घातला व नंतर दरोडेखोरांना आम्ही आलेले समजताच दरोडेखोरांनी लगेचच तेथून पळ काढला त्यामधील दोन दरोडेखोर वेगवेगळ्या दिशेने पळाले व एक मोटारसायकल वरती बसला होता. त्यानेही लगेच पळ काढला त्यानंतर आम्हीं त्यांचा पाठलाग सुरू केला.एक जण स्वरूप नगर मध्ये भिंतीवरून उडी मारून निघून गेला व दुसरा तेथील उसात लपून बसला आम्ही पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी दोघांचा पाठलाग सुरू ठेवला होता बराच वेळ गेल्यावर ते शिवतेज नगर येथील उसाच्या शेतात शिरले परंतु त्याचा मी बॅटरीच्या उजेडात चेहरा स्पष्ट बघितला होता.आम्ही होमगार्ड व सर्व पोलीस कर्मचारी यांनी पहाटे 6 वाजेपर्यंत ऊसाचे सर्व शेत शोधले परंतु ऊसाला पाणी दिले असल्यामुळे जास्त शोध घेऊ शकलो नाही.परंतु तो एक जण उसात शिरला असल्यामुळे मी तिथून निघून गेलो नाही इतर सर्वांनी येण्याजाण्याच्या रस्त्याला बंदोबस्त लावला व नाकाबंदी केली तिथून सर्व निघून गेल्याचे कळताच दरोडेखोर शेतातून नागरी वस्तीत आला.रात्री पळताना त्याचे सँडल व ATM शेजारी पडले होते.त्यामुळे तो अनवाणी होता मी मेन रस्त्याने पेट्रोलिंग चालू केले.पहाटे सर्व नागरिक उठून चालण्यासाठी व रानींग साठी बाहेर पडले होते.त्या अंधारात एवढ्या थंडीत तो एकटा इतर नागरिकांबरोबर बिगर चप्पल चा हळूहळू जॉगिंग करत पळत होता.परंतु थोडा अंधार असल्याने सर्व स्पष्ट दिसत नव्हते व महिला सोबत असल्याने टॉर्च मारू शकत नव्हतो.तरी पण त्याने पिवळा फुल शर्ट कमरेला बांधला होता व पायात चप्पल नव्हती.मला संशय आल्याने मी जवळ गेलो.जवळ जाताच बघितले असता त्याची पॅन्ट चिखलाने भरली होती.त्याचे पाय ओले होते.व कपड्याला चिकट्याचे गवत लागले होते त्याची खसून विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.त्यामुळे माझा संशय अधिकच बळावला मी त्याला पकडले परंतु हिसका मारुन त्याने तिथूनही पळ काढला.मी पाठलाग करून त्याच्या कमरेत हात घालुन बेल्ट सहित पकडले व माझा सहकारी होमगार्ड सागर पवार ला सांगितले की याच्या पाठीला बंदूक लावून धर व पळाला की गोळी घाल तसे पहाता आमचे कडे कोणतेही शस्त्र नव्हते.आरोपी च्या कमरेला धरून पवारला सांगितले असता बंदूक लाव तेव्हा तो घाबरला.पवारने स्वतःच्या जर्किंग च्या खिशात हात घालून बोट आरोपच्य कमरेला टोचवले त्यामुळे चोराला वाटले की बंदूक आहे.त्यामुळे तो घाबरुन पळू शकला नाही. व पुढील कार्यवाही साठी त्याला अकलुज पोलीस स्टेशनमध्ये आणून जमा केला.त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सर्व हकीकत सांगितली.अशी ही थरारक व सिनेस्टाईल घटना आमच्या सोबत पहील्यांदाच घडली असल्याचे होमगार्ड नरेंद्र पाटोळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.