सदगुरुची ॲडव्हान्स उचल 2200 : शेतकऱ्यांध्ये आनंदाचे वातावरण…!
पिलीव/प्रतिनिधी
सद्गुरु श्री श्री रविशंकर जी गुरुजी यांचे आशीर्वादाने व चेअरमन श्री एन शेषागिरी राव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील व सर्व संचालक मंडळाच्या शिस्तप्रिय मार्गदर्शनाखाली आणि ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी,कर्मचारी,कामगार या सर्व घटकांच्या सहकार्यातून सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याने २०२०-२१ या चालू हंगामामध्ये गाळपास आलेल्या ऊसाला ॲडव्हान्स उचल रु.२२०० ( दोन हजार दोनशे रुपये) शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केल्याने सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. तांदूळवाडी येथील वारकरी संप्रदायाच्या दत्तात्रय ईश्वर करांडे या ७२ वर्षीय ऊस उत्पादक सभासदाने याबाबत चेअरमन , व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाला दूरध्वनी वरून आनंद व्यक्त करून धन्यवाद दिले.सर्व ऊस उत्पादक शेतकरी आनंद व समाधान व्यक्त करताना दिसून आले. त्याच सोबत अनेकांनी कारखान्याच्या ऊस तोडणीचे उत्तम नियोजन असल्यामुळे साखर उतारा चांगला येऊन त्यातून आम्हा ऊस उत्पादकांचा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.