चांदापुरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ.रेशमा सरतापे यांची बिनविरोध निवड..!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विद्यमान सदस्य सौ.रेश्मा विलास सरतापे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.चांदापुरी ग्रामपंचायत निवडणूकीत जनतेतून निवडून आलेल्या सौ.द्रोपदा कवळे यांनी स्थानिक स्तरावर ठरल्याप्रमाणे राजीनामा सादर केलेने सदरचे चांदापूरीचे सरपंच पद रिक्त होते.या रिक्त पदावर निवड करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी शेखर तपासे व संदीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत सर्वसदस्यातून सरपंच पदाची निवड करण्यात आली.सरपंच पदासाठी एकमेव सदस्य सौ.रेश्मा विलास सरतापे यांचाच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने व सदरचा उमेदवारी अर्ज छाननीतही वैद्य ठरल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी शेखर तपासे व संदीप चव्हाण यानी जाहीर केली.

निवडणूक निर्णय आधिकार्यांचे तलाठी अमोल खेडेकर ग्रामसेवक कोरबू भाऊसाहेब व संजय लोखंडे यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले तर यावेळी विद्यमान सदस्य व माजी सरपंच भजनदास चोरमले,सौ.रेश्मा सरतापे, उपसरपंच संतोष कोपनर, भगवान सुळ, सौ शेषाबाई सरक ,सौ सुवर्णा गायकवाड, सौ पद्मिनी जाधव, सौ.सुनिता सातपुते, आदि सदस्य उपस्थित होते.निवडीनंतर वाजत गाजत फटाक्याची आतषबाजी करीत ग्रामदैवत श्री.मारुतीचे दर्शन घेतल्यानंतर सरपंच सौ.रेशमा सरतापे यांनी लगेचच सरपंच पदाचा पदभार स्वीकारला.यावेळी माजी सरपंच भजनदास चोरमले,तानाजी कोपनर,नवनाथ कोपनर,दादासाहेब सरतापे , तंटामुक्तीचे अध्यक्ष गौरीहार बोडरे,नितीन सरक,हनुमंत सरतापे,योगेश सरतापे,समाधान साबळे व ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *