माझी जन्मभूमी म्हणून पिलीव पंचक्रोशीतील ग्रामस्थांची सेवा करणार – डॉ.तुषार गुळभिले

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील अक्षय हॉस्पिटल,सर्जिकल ॲन्ड मॕटर्निटी होमचे मालक तथा पिलीव परिसरातील नामांकित डॉक्टर व चैतन्य पतसंस्थेचे चेअरमन डॉ.मिलींद गुळभिले यांचे सुपुत्र कन्सल्टिंग जनरल सर्जन डॉ.तुषार गुळभिले (MBBS,MS) यांच्या वाढदिवसानिमित्त आज रविवार दिनांक 13 डिसेंबर रोजी त्यांचा पिलीव पत्रकार संघाच्यावतीने शाल,श्रीफळ,फेटा व पुष्पहार देवून यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ.तुषार गुळभिले यांनी सांगितले कि जनरल सर्जरी,युरोसर्जरी,स्त्री रोग,दुर्बिनीद्वारे शस्त्रक्रिया,एक्स-रे,सर्व प्रकारचे हॉर्निया,पोटाचे व आतड्याचे विकार,शरीरावरील व आतील गाठी,ॲपेंडिक्स,मुळव्याध,भगेंदर,स्तनामधीलल गाठी व कर्करोग,पायाच्या नसा फुगणे,पित्ताशयाचे अजार,थायरॉडचे आजार,प्रोस्टेट चे आजार,गर्भाशयाच्या पिशवीचे आजार,हायड्रोसील,सर्व प्रकारचे कर्क रोग व प्लास्टीक सर्जरी या सर्व आजारांवर पिलीव पंचक्रोशीतील गोर-गरीब रुग्णांवर अगदी अल्पदरात उपचार करण्यासाठी अक्षय हॉस्पिटलचे 24 तास दारवाजे खुले असतील व मी मुंबई,पुण्याला न जाता केवळ आपल्या गावातील लोकांची सेवा करण्याचे भाग्य लाभावे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून व माझी जन्मभूमी म्हणूनच पिलीव गावात राहण्याचा निश्चय केला असल्याचेही डॉ.तुषार गुळभिले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.यावेळीडॉ.मिलींद गुळभिले,पिलीव पत्रकार संघाचे अध्यक्ष सुजित सातपुते,जेष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे,प्रमोद भैस,संजय रोकडे,सुरज काटकर,भूषण मेथवडे आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *