पिलीव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच नितीन माळी व माजी सरपंच संग्राम पाटील यांच्यात विवीध प्रश्नावरुन खडाजंगी…!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव ग्रामपंचायतीच्या मासिक मिटिंगमध्ये गाळेधारकांच्या विविध मागण्यांच्या अर्जाची चर्चा मीटिंगमध्ये न केल्यावरून व अर्ज न वाचले वरून विरोधी सदस्यांनी विद्यमान सरपंच नितीन माळी यांना धारेवर धरले होते.सरपंच ग्रामपंचायत चालविण्यास असमर्थ असून नागरिकांनी दिलेले अर्ज गहाळ केले जातात व,ज्या कामासाठी निधी मंजूर होतो त्याच कामासाठी व त्याच ठिकाणी तो निधी वापरला जात नाही,इस्टिमेट प्रमाणे काम केले जात नाही.असे विरोधी पार्टीचे माजी सरपंच संग्राम पाटील,ग्रा पं सदस्य राजेंद्रसिंग जामदार यांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन विद्यमान सरपंच नितीन माळी यांच्यावर आरोप केले आहेत.यावेळी विरोधी पार्टीचे सदस्य गणेश लोखंडे,जीवन गुरव व अशोक बगाडे,कुमार लोखंडे उपस्थित होते.या विरोधी गटाच्या सदस्यानी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोप खुडून टाकण्यासाठी विद्यमान सरपंच नितीन माळी यांनीही पत्रकार परिषद घेऊन आपले मत व्यक्त करताना त्यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपात कसलंही सत्य व तथ्य नसून खोट्या माहितीच्या आधारे आरोप केल्याचे सांगितले.गाळेधारकांचा अर्जच ग्रामपंचायतीकडे दाखल झालेला नाही.अर्ज आसेल तर अर्ज न वाचण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.वरील गोंधळ घालणारे माजी सरपंच व विद्यमान सदस्य यांनी सरपंचाला असभ्य भाषेत एकेरी उल्लेख करीत सभागृहात अपमानकारक वक्तव्य करून असभ्य वर्तन केले जाते.शिष्टाचार पाळत नाहीत व मासिक मिटिंगमध्ये अजेंड्यावर आलेले सर्वच विषय वाचले जातात.त्यावर सविस्तर चर्चा होऊन गावाचा विकास व सर्वसामान्य नागरिकांचे हित पाहिले जाते व विषय संपल्याने मी मिटींगचा अध्यक्ष या नात्याने मिटिंग संपल्याचे जाहीर केले होते.यावरुन विरोधकानी गोंधळ घातला.तर ग्रामपंचायतीच्या विमाग्राम निधीचा माजी सरपंच यानी गैरव्यवाहर केला आसल्याचे दिसून येत आसल्याने व विद्यमान सदस्य आणि माजी सरपंच यांनी विमा ग्राम निधीचा सीसीटीव्ही कॅमेरा खरेदी करण्यासाठी दिलेल्या निधीची कुठेही नोंद नाही.किंवा तसा ग्रामपंचायतीच्या ठराव पुस्तकात उल्लेख नाही.म्हणून माजी सरपंच यांनी या निधीचा गैरवापर केला असल्याने माजी सरपंच यांना संबंधित खात्याने खूलासा करावा म्हणून नोटीस काढल्या आसून त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई चालू झाली आसून तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी एका ग्रामस्थाने प्रस्तावाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्याकडे केली आहे. तर दुसरे विद्यमान सदस्य यांनी शासनाच्या जागेवर अतिक्रमण केले आसलेने त्यांचेवरही सदस्यत्व रद्द व्हावे असा प्रस्ताव पाठविला आहे व कारवाई व्हावी अशी मागणी केलेली आहे तर विरोधकांनी केलेले सर्व आरोप निराधार असल्याचे विद्यमान सरपंच यांनी सांगितले.गावाच्या मुख्य पेठेतील ही रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाली आहे.सदरचे रस्ते यापूर्वीच्या नागरीआघाडीच्या सत्ताकालावधीत केले होते.या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केले होते. आत्ता खराब झाले असून त्याला पूर्वीच्या सत्ताधारी यांनी निधी घेतला नसेल तर सदरच्या कामास पून्हा निधी मिळाल्यास हे ही रस्ते दुरुस्त करू तसेच बसस्थानकावरील व्यापारी गाळ्याचे जिर्णोव्दार करून नवीन गाळे बांधणेस संबंधित खात्याची मंजूरी व निधीची तरतूद झाली आसून गाळे बांधून पूर्ण झाल्यानंतर पूर्वीच्याच गाळेधारकांना गाळे देण्याचे ग्रामपंचायतीचे धोरण असून जे गाळेधारक डिफॉल्टर किंवा थकीत आहेत त्यांना द्यायचे का नाही याचा फेरविचार केला जाणार आहे.गावातील नागरिकांच्या हिताचा विकासाचा प्राधान्याने विचार केला जात असून सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून सर्व प्रकारच्या मूलभूत गरजा,सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.मात्र विरोधक नेहमीच व्देषाचे राजकारण करत असल्याचा आरोप विद्यमान सरपंच नितीन माळी केला.महाराष्ट्र राज्याचे माजी उप-मुख्यमंत्री तथा माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,माजी सभापती संग्रामसिंह जागीरदार,पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावासाठी विविध योजना मंजूर करून गावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय व अजेंडा असून सर्व सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानूनच आम्ही काम करत असल्याचे विद्यमान उपसरपंच संजय आर्वे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.