अखेर पिलीवच्या शाळेची घंटा वाजली : संग्रामसिंह जहागिरदार यांच्या उपस्थितीत झाला निर्णय..!

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील व रमेश खलिपे ज्युनिअर कॉलेज हे कोरोनाच्या महामारीमुळे 25 मार्च 2020 पासून बंद राहीले असल्याने तब्बल नऊ महिने या शाळेची घंटाच वाजली नव्हती.परंतु आज शनिवार दिनांक 5 डिसेंबर रोजी माजी सभापती तथा स्कुल कमिटीचे सदस्य संग्रामसिंह जहागिरदार यांच्या अध्यक्षतेखाली शाळा सुरु करायची कि नाही ? या संदर्भात विद्यालयाचे मुख्यद्यापक लेंडवे सर यांनी बैठकीचे आयोजन केले होते.

पालकांच्या व शिक्षकांच्या उपस्थितीत सदर बैठकीत विद्यार्थांची योग्य ती जबाबदारी घेवून 40-40 मिनिटांचे एकुण 4 तास घेतले जातील व सोमवार दिनांक 7 डिसेंबर पासून सकाळी 11 ते 1:30 या वेळेत फक्त इयत्ता 10 वी व 12 वी चे वर्ग भरतील असे एक मताने ठरवून शाळा सुरु करण्याचे ठरविण्यात आले.यावेळी संग्रामसिंह जहागिरदार यांनी प्रत्येक पालकांच्या वैयक्तिक प्रतिक्रिया जाणून घेतल्या व पालकांना आणि शिक्षकांना योग्य ती खबरदारी घेवून शाळा सुरू करण्यास सांगितले.10वी,12वी चे सत्र सुरळीत चालु झाल्यास इयत्ता 9वी व 11वी चे ही वर्ग लवकरच भरवले जातील असे मुख्यद्यापक लेंडवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी अविनाश जेऊरकर,प्रकाश जाधव,शाळा व्यवस्थापन समितीच्या सचिव श्रीमती कांबळे के.बी,शाळा व्यवस्थापन विकास समितीच्या सचिव कुलकर्णी ए.ए,पालक शिक्षक संघाचे सचिव अतुल पाटील व सर्व सदस्य,

सुनिल चव्हाण,शशिकांत लोखंडे,राजेंद्र राऊत,मुबारक तांबोळी,शिक्षक व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आभार प्रदर्शन माळी डी.डी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *