अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांची पिलीव येथील युवा उद्योजक प्रकाश जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..!

पिलीव/प्रतिनिधी
उपविभागीय पोलिसाधिकारी निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विश्वंबर गोल्डे व पिलीव औट पोस्टचे पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ महानवर यांच्या संकल्पनेतून व पिलीव पंचक्रोशीतील देणगीदार ग्रामस्थांच्या मदतीने अगदी अल्पावधीतच पिलीव औट पोस्टची भव्य अशी इमारत उभा राहीली आहे हि इमारत एक चर्चेचा विषय बनला असल्यानेच व सदर इमारतीच्या उद्धघाटन प्रसंगी उपस्थित न राहता आल्याने सोलापूर जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे काल बुधवार दिनांक 2 डिसेंबर रोजी पिलीव येथे आले होते.सदर प्रसंगी वैष्णवी कंन्ट्रक्शनचे सर्वेसर्वा तथा पिलीव गावचे युवा उद्योजक प्रकाश (आबा) जाधव यांच्या निवास्थानी अतुल झेंडे यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी श्री.प्रकाश जाधव व सौ.संगिता जाधव यांनी सपत्निक अतुल झेंडे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार देवून सन्मान केला.पिलीव सारख्या ग्रामीण भागातून कन्ट्रक्शन व्यवसायामध्ये अल्पावधीत गगनभरारी घेतल्याने युवा उद्योजक प्रकाश जाधव यांचाही अतुल झेंडे यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.यावेळी पोलिस निरीक्षक विश्वंबर गोल्डे व सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *