महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व संशोधन केंद्र सुरू करणार – डॉ.कुमार लोंढे
पिलीव/प्रतिनिधी
सहा डिसेंबर रोजी महामानव,बोधिसत्व,विश्वरत्न,घटनेचे शिल्पकार यांचे नावे डॉ.बाबासाहेब आंबेडकरअभ्यासिका व संशोधन केंद्र सुरू करून या महापरिनिर्वाण दिनी आगळी वेगळी आदरांजली वाहण्याचा संकल्प सोशल या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे यांनी केला आहे.सदर सेंटरचे भूमिपूजन व उदघाटन सदाशिव देठे प्रशाला व ज्यू कॉलेज चांदापुरी (माळशिरस) सोलापूर या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

सोशल या संस्थेच्या माध्यमातून 2010 पासून शासनाच्या कोणत्याही अनुदानाशिवाय रक्तदान शिबिरे, गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप,आई वडील नसणारे विद्यार्थी प्रत्येक वर्षी (दहा)दत्तक घेणे,दुष्काळग्रस्त मुलींना अर्थसाहाय्य,ग्रामीण भागात अंकुर चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू आहे या माध्यमातून 200 बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा संकल्प आहे,पंढरपूर वारी असो दादर येथील चैत्यभूमी,ऊसतोड कामगार यांच्यासाठी मोफत आरोग्यसेवा उपक्रम राबवून हजारो लोकांवर औषधोपचार करण्यात आलेत.सांगली कोल्हापूर पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू,कपडे,शैक्षणिक साहित्य व आरोग्य तपासणी इ माध्यमातून सहकार्य केले आहे.ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून पहिली पासून बारावी पर्यंत शाळा सुरू केली आहे.मानवी हक्क,शिक्षक,विद्यार्थी ,विजतंत्रिकी, ग्रामविकास इ मुद्दे अग्रक्रमी घेऊन संस्था कार्यरत आहे.
लोकांचे प्रेम व विश्वास या जोरावर प्रत्येक संकल्प तडीस जाऊ शकतो याचे उदाहरण आहे. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल प्रादेशिक,राष्ट्रीय पूरस्कार मिळाले आहेत तसेच दुबई येथे 52 देशाच्या परिषदेत आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
Pay Back to Society या उक्तीप्रमाणे संस्थेच्या विश्वस्त डॉ.पंचशीला लोंढे,संचालक अपराजित सर्वगोड यांनी सदर सेंटर साठी मदत रोख/पुस्तक अथवा वस्तू स्वरूपात करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
◆संस्थेचे नाव
Social Development Society
◆ अकाउंट न
071310110005857
◆ IFSC CODE
BKID0000713
◆ BRANCH
PILIV
◆ Google pay/Phone pay◆
9881643650
अधिक माहितीसाठी
मो.9130500053
7020400150