काळमवाडीच्या श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा साधेपणाने परंतु उत्साहात साजरी..!
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील काळमवाडीच्या श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा कोरोना रोगाच्या पार्शवभूमिवर साधेपणाने पण उत्साहात सर्व धार्मिक विधी पार पाडून साजरी करण्यात आली.

यावेळी देवाच्या सुहासिनीचा गावातील महिलांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला तसेच यात्रेदरम्यान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, शिवामृत दुधसंघाचे अध्यक्ष धैर्यशिल मोहिते पाटील माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती अर्जूनसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य गणेश पाटील, अरुण तोडकर, शिवामृत दुध संघाचे संचालक दत्तात्रेय आवताडे संचालक पत्रकार हारिभाऊ मगर, निमगावचे दत्ताप्पा मगर, पिलीवचे सरपंच नितीन माळी, पिलीव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दामोदर लोखंडे, कुसमोडचे माजी उपसरपंच संजय पाटील दुर्योधन सोलंकर चेअरमन सुनिल खूर्द , अभिजित तावरे आदि मान्यवरांनी काळमवाडी यात्रेला भेटी दिल्या.यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी शिवामृत दुधसंघाचे संचालक माजी सरपंच दादासाहेब शिंगाडे सरपंच ज्ञानेश्वर करडे, उपसरपंच रामचंद्र पवार समाधान दुपडे संजय शिंगाडे विक्रम शिंदे देवीदास शिंदे , शब्बेकदिरखान पठाण काशिनाथ शिंगाडे व मानकरी पूजारी यानी परिश्रम घेतले.