माजी उपसभापती किशोरभैया सुळ यांच्या वाढदिवसानिमित्त CSK क्रिकेट क्लबच्यावतीने भव्य हापपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा – एजाज पठाण
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष माजी उपसभापती मा.श्री किशोरभैय्या सुळ यांच्या वाढदिवसानिमित्त माळशिरस तालुक्यातील पठाण वस्ती येथे मंगळवार दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी दहा वाजता भव्य हापपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ होणार असल्याचे किशोरभैय्या सुळ यांचे खंदे समर्थक तथा पठाण वस्ती ग्रा.पं सदस्य मा.श्री एजाज पठाण यांनी माळशिरस टाईम्सशी बोलताना सांगितले.सदर स्पर्धेतील बक्षिसे खालीलप्रमाणे

प्रथम बक्षीस आकरा हजार रुपये माजी उपसभापती किशोरभैय्या सुळ यांच्यावतीने,द्वितीय बक्षीस सात हजार रुपये पठाणवस्ती ग्रा.पं सदस्य एजाज पठाण व चांदापुरी विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन तनवीर पठाण यांच्यावतीने,तृतीय बक्षीस पाच हजार रुपये जब्बार आतार यांचेकडून,चतुर्थ बक्षिस तीन हजार रुपये अर्शदकाका पठाण व जस्मिन ऑटो गॅरेज पिलीवचे इस्त्राईलभाई शेख यांचेकडून तर वैयक्तिक पारितोषिके मॅन ऑफ द मॅच 1001 आदिल पठाण यांच्याकडून,मॅन ऑफ द सिरीज 1001 चेअरमन पितांबर मगर यांचेकडून,सलग चार षटकार 1001 इरफान टिपू पठाण यांचेकडून,सलग चार विकेट 1001 वशिम मालक पठाण यांचेकडून तर सलग चार चौकार 1001 रमजान शेख वेळापूर सदर स्पर्धेसाठी प्रवेश फी 400 रुपये राहील संपर्क फरहान पठाण 93 70 22 46 55, मोहसीन पठाण 98 22 92 12 87, नदीम पठाण 95 52 10 92 77, तोहिदबाबा शेख 99 60 80 37 77, सदर स्पर्धेचे संयोजन तौसिफ, इरफान, शाहबाज, सौरभ, अक्षय, सचिन, अजय, मोहिन, सुशांत, सुनील, फराज, आयान ,राहुल, महेश ,ऋषिकेश, आयान यांनी केलेले आहे.सदरच्या स्पर्धेत पंचाचा निर्णय अंतिम राहील,खेळाडूंची शारीरिक जबाबदारी स्वतःची राहील,गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूंचा संघ बाद केला जाईल,एक खेळाडू एकाच संघातुन खेळू शकेल अशी माहीती एजाज पठाण यांनी दिली असून पिलीव सह माळशिरस तालुक्यातील जास्तीत क्रिकेट संघानी सदर स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे अवाहन पठाण यांनी केले आहे.