माझ्या बहिणीची आत्महत्या नाही तर हत्याच – दादा काटे
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील बचेरी येथील हनुमंत काटे यांची मुलगी भाविका हिचा सन 2012 साली तुकाराम नगर शिवाजी चौक वाल्हेकरवाडी चिंचवड येथील मिलिंद पांडुरंग वाघमारे यांच्या सोबत विवाह झाला होता.भाविकाचे लग्न झाल्यानंतर काही दिवसातच तिचा पती मिलिंद हा दारू पिऊन भाविकाला त्रास द्यायला लागला.मिलिंदला दारू पिण्याचे खूप व्यसन होते.त्यामुळे मिलिंद भाविकाला रोज शिवीगाळ करून मारहाण करत होता.भाविकाची सासु माया पांडुरंग वाघमारे सासरे पांडुरंग वाघमारे हे दोघेही भाविकाला मानसिक त्रास देत असे व नणंद मनिषा कांबळे नंदावा विकास कांबळे हे दोघेही भाविकाच्या सासू सासर्याला व पतीला सतत भाविका बद्दल वाईट गोष्टी सांगून मानसिक त्रास देत होते.हा सर्व प्रकार माझी बहीण भाविका ही मला व माझ्या घरच्यांना समक्ष व फोनवरून वारंवार सांगत होती असे भाविकाचा भाऊ दादा काटे याने चिंचवड येथील पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.परंतु आम्ही मिलिंदला नेहमी समजावण्याचा प्रयत्न केला.परंतु मिलींदच्या वागण्यात काहीही फरक पडला नाही सन 2014 मध्ये भाविकाला मुलगी झाली नंतर सन 2019 मध्ये मुलगा झाला परंतु भाविकाचा त्रास काही कमी झाला नाही.त्यामुळे नोव्हेंबर 2019 मध्ये मी माझ्या बहिणीला माहेरी म्हणजेच माळशिरस तालुक्यातील बचेरी या गावी घेऊन आलो परंतु मिलिंद याने सतत फोन करून भाविकाला डिसेंबर 2019 मध्ये माघारी चिंचवड येथे बोलावून घेतले असा एकदा नाही तर दोन वेळा प्रकार घडला व शेवटी काल 24 नोव्हेंबर रोजी भाविकांवर काळाने घाला घातला.सकाळी 11:30 वाजता मला दाजी मिलिंद वाघमारे याचा फोन आला व भाविकाने राहत्या घरामध्ये गळफास घेतला असल्याबाबत कळविले.तेव्हा मी लागलीच आई-वडिलांना तसेच नातेवाईकांना फोनवर माहिती सांगून चिंचवड येथे आलो.त्यानंतर आम्ही वायसीएम हॉस्पिटल पिंपरी येथे गेलो असता 12:25 वाजता भाविकाचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.माझ्या बहिणाच्या मृत्यूस जबाबदार असणार्या वरील लोकांच्या विरोधात चिंचवड पोलिसांत तक्रार दिली असून त्यांच्यावरती 306,498-A,323,504,34 या कलमांतर्गत गुन्हें दाखल झाले आहेत.परंतु माझ्या बहीणीने आत्महत्या केली नसून तिची हत्या केली आसल्याचा अरोप भाविकाचा भाऊ दादा काटे याने सासरच्या लोकांवर केला आहे.माझा पोलिस प्रशासन व न्याय देवतेवरती पुर्ण विश्वास आहे.ते शव विच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर कलमात वाढ करुन संबंधितांना कठोरात कठोर शिक्षा देतील अशी आशा बळगून राहीलो असल्याचे दादा काटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.