पिलीव येथे प्रकाश करांडे यांच्या वीर हनुमान कुस्ती आखाड्याचे संग्रामसिंह जहागिरदार यांच्या शुभ हस्ते उद्धघाटन..!

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील प्रगतशील बागायतदार प्रकाश (पिंटू) नारायण करांडे यांनी स्वतःच्या दोन मुलांना पैलवान बनविण्याची मनाशी एक जिद्द बाळगून व एक पैलवानकीचा छंद म्हणून आपल्या स्वताच्या शेतात आज सोमवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी दिपावली पाडव्याचे औचित्य साधून माजी सभापती संग्रामसिंह जहागिरदार यांच्या शुभ हस्ते वीर हनुमान कुस्ती आखाड्याचे उद्धघाटन करण्यात आले.यावेळी जि.प.सदस्य गणेश पाटील,पं.स.सदस्य शहाजीराव महाडीक,सरपंच नितीन माळी,उपसरपंच संजय आर्वे,तनवीर पठाण,मोहन करांडे,नारायण सुळे,इन्तियाज पठाण,ॲड.ईश्वर हुबाले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रकाश करांडे यांनी खास आपल्या स्वताच्या मुलांसाठी चक्क कुस्ती आखाडा बांधल्याने पिलीवसह परिसरामध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.खास करुन स्वताच्या मुलांसाठी कुस्ती आखाडा बांधून मुलांना व्यायामाचे धडे शिकवणे व लाल मातीशी नाते घट्ट करणे असे आवघ्या पिलीव परिसरातच नव्हे तर माळशिरस तालुक्यात पहिल्यांदाच असे घडले असेल असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.