पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे यांचा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते व अतुल झेंडे यांच्या हस्ते सन्मान…!
पिलीव/प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विश्वंबर गोल्डे यांचा काल मंगळवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय सोलापूर येथे नूतन पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते व अतुल झेंडे साहेब यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.
1)गुन्हा रजि नं 86/2018 IPC 392,504
2)गुन्हा रजि नं 511/20 IPC 392,457 वगैरे
3)गुन्हा रजि नं 318/20 IPC 392,34
या व अशा इतर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या पोनि गोल्डे साहेब यांनी मुसक्या आवळल्याने त्यांच्या या प्रशंसनीय कामाबद्दल पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते व अतुल झेंडे साहेब यांनी पोनि विश्वंबर गोल्डे यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
