पिलीव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना दिपावलीसणानिमित्त बोनस वाटप..!

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना माजी सभापती संग्रामसिंह जहागिरदार,जि.प.सदस्य गणेश पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व 16 ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहमतीने 17 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना,प्रत्येकी रु.3000 रुपये व संपूर्ण कपड्याचा ड्रेस बोनस म्हणून सरपंच नितीन माळी,उपसरपंच संजय आर्वे ग्रामविकास अधिकारी अनिल सावळजकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य, संतोष बगाडे, जीवन गुरव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दामोदर लोखंडे,प्रमोद भैस व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *