इंण्डेन घरगुती गॅस सिलेंडर नोंदणीसाठी आता एक कॉमन क्रमांक जारी…!
पिलीव/प्रतिनिधी
देशभरातील ग्राहकांच्या सोयीसाठी इंडियन ऑइलतर्फे आणखी एक पुढाकार घेत इंण्डेन घरगुती गॅस सिलिंडर नोंदणीसाठी एक कॉमन नंबर जारी केला आहे.आता ग्राहक 7718955555 या क्रमांकावर गॅस सिलिंडरची नोंदणी करू शकतील. ग्राहकांसाठी ही सुविधा 24×7 उपलब्ध असेल.या क्रमांकावर SMS किंवा IVRS च्या माध्यमाने LPG सिलिंडर नोंदणी करता येऊ शकेल. ग्राहकांसाठी ही मोठी सोय झाली असून इंडेन LPG रिफील सिलिंडर नोंदणी करणे आता अधिक सोपे आणि सोयीचे झाले आहे. ग्राहक कोणत्याही राज्यात किंवा टेलिकॉम सर्कलमध्ये असले तरी त्यांचा इंडेन रिफील नोंदणी क्रमांक हा तोच राहणार आहे.सध्या अस्तित्वात असलेली वेग-वेगळ्या टेलिकॉम सर्कलसाठी वेगळ्या इंण्डेन रिफील नोंदणी क्रमांकाची योजना 31.10.2020 च्या मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत आहे. त्याऐवजी LPG रिफील नोंदणीसाठी एकच कॉमन क्रमांक 7718955555 हा असेल.असे पिलीव येथील यशवंत बाबा इंण्डेन ग्रामीण वितरकचे सर्वेसर्वा मा.श्री मनोज हणुमंत कोळी यांनी माळशिरस टाईम्सशी बोलताना सांगितले.
