पिलीव व पिलीव परिसरामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून नवरात्र उत्सव उत्साहात साजरा

पिलीव/प्रतिनिधी
पिलीव येथे श्री श्रीराम दुर्गामाता नवरात्र मंडळ श्रीराम गल्ली,श्री दुर्गामाता नवरात्र मंडळ एस टी स्टँड, श्री यल्लामा देवी मंदिर साठे नगर, तुळजाभवानी नवरात्र मंडळ गुजरे मळा, श्री दुर्गामाता नवरात्र मंडळ मोहिते मळा , त्याचप्रमाणे श्री महालक्ष्मी मंदिर लोहार गल्ली , चौंडेश्वरी मंदिर , दुर्गामाता मंदिर नरसिंह गल्ली, तुकाराम तावरे निवास , उमेश सरवदे निवास , बाळकृष्ण माने निवास, त्याचप्रमाणे ग्रा.पं. पाठीमागे श्री महालक्ष्मी मंदिर व तुळजा भवानी मंदिर तसेच यमाई मंदिर जनवर मळा , श्रीमहालक्ष्मी मंदिर बगाडे वस्ती , श्री तळ्यातील आई घुमट मळा,पिलीव येथील सर्व नवरात्र मंडळांतील व मंदिरातील तसेच बचेरी येथील तिन्ही नवरात्र मंडळ व सुळेवाडी येथील सर्व नवरात्र मंडळांनी व भवानी मंदिर झिंजेवस्ती आणि साळूबाई मंदिर साळमुख याठिकाणच्या सर्व कार्यकर्त्यांनी कोरोना प्रादुर्भावाला दूर ठेवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून अतिशय साध्या पद्धतीने धार्मिक विधी ,आरती अशा नियोजनातून नवरात्र महोत्सव मोठ्या भक्तिभावाने ‘ उदं ग अंबे उदं’ या जयघोषात साजरा केला.त्यामुळे वरील सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांचे पोलीस प्रशासन,आरोग्य विभाग व परिसरातील ग्रामस्थ यांच्याकडून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *