पिलीव येथील वृत्तपत्र विक्रेते संजय रोकडे यांचा दै.सकाळच्या वतीने सन्मान पत्र देऊन गौरव
पिलीव/प्रतिनिधी
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्म दिवस. हाच दिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून ही साजरा केला जातो या वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त पिलीव येथील वृत्तपत्र विक्रेते संजय रोकडे यांचा दै.सकाळ समुहाच्या वतीने कोरोनाच्या काळातही आपल्या जिवाची पर्वा न करता वृत्तपत्र विक्रीचे काम केले.याबद्दल सकाळ समुहाच्या वतीने त्यांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. याबद्दल पिलीव पत्रकार संघ,वाचक वर्ग व विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या कडून संजय रोकडे यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.