पदवीधरांना न्याय मिळवून देण्यासाठीच मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे – ॲड.विजय लेंगरे

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव ( झिंजेवस्ती) येथील ॲड.विजय शामराव लेंगरे हे पुणे पदवीधर मतदारसंघातुन अपक्ष म्हणून आपले नशीब अजमावीत आहेत.ते पुणे येथे वकीली व्यवसाय करतात त्याचबरोबर ते गेल्या अनेक वर्षांपासून सर्वमान्यांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत.ते पुणे पदवीधर मतदारसंघातुन निवडणूक लढवित असताना उच्च विभुषीत तसेच सुशिक्षित उमेदवार असल्यामुळे त्यांना विविध संघटनानी पाठिंबा दिला आहे यामध्ये मल्हार आर्मी महाराष्ट्र राज्य, छावा ग्रुप महाराष्ट्र राज्य, धनगर समाज युवक महासंघ,राजे उमाजी बेडर समाज संघटना महाराष्ट्र राज्य, श्री वडार महासंघ महाराष्ट्र राज्य, भिम बटालीयन महाराष्ट्र राज्य, वैदु समाज महासंघ पुणे, भिम क्रांती संघटना कोल्हापूर, सुराज्य निर्माण सेना पक्ष अश्या विविध संघटनानी ॲड.विजय लेंगरे यांना निवडणुकीसाठी जाहीर पाठींबा दिला आहे.यंदाच्या पदवीधर निवडणुकीत तब्बल ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.महाराष्ट्रात मेंढपाळासाठी काम करणारे संतोष बिचुकले यांनी पुढाकार घेऊन वंचित घटकातील उच्च शिक्षीत ॲड.विजय लेंगरे यांना उमेदवार म्हणून उभे केले असुन महाराष्ट्रातील ओबीसी व आंबेडकरवादी संघटनांचा ॲड.विजय लेंगरे यांना पाठिंबा आहे.ॲड.विजय लेंगरे यांनी यावेळी बोलताना एक पदवीधर या नात्याने आपणास सर्व समस्या माहीत आहेत,खऱ्या अर्थाने पदवीधरांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण ही निवडणूक लढवित असल्याचे लेंगरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *