कोणतीही निवडणूक असुद्या विरोधकांवर कधीच विजयाचा गुलाल पडू देणार नाही – दादा शिंगाडे
काळमवाडी विकास संस्थेच्या निवडणुकीत सिध्दनाथ ग्रामविकास आघाडीचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी..!
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील काळमवाडी येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत काळमवाडीचे माजी सरपंच तथा धैर्यशील मोहिते-पाटील यांचे खंदे समर्थक दादा शिंगाडे व दत्तात्रय आवताडे यांच्या सिद्धनाथ ग्रामविकास आघाडीचे सर्वच्या सर्व 13 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

29 एप्रील रोजी सकाळी सात ते चार वाजेपर्यंत मतदान झाले त्यानंतर मतमोजणी झाली .798 मतदारापैकी 700 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला सरासरी 94 टक्के मतदान झाले.मतमोजणी वेळी पहील्या पासुनच सिध्दनाथ ग्रामविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती.शेवट पर्यंतती आघाडी टिकून राहीली व सर्व 13 उमेदवार 85 ते 90 च्या मताधिक्याने विजयी झाले.यामध्ये सर्वसाधारण गटातुन अशोक आसबे,भगवान आवताडे,नंदकुमार आवताडे, प्रकाश आवताडे, हनुमंत भोसले, सिताराम इंदलकर, पांडुरंग माने,दत्तु सुळ हे उमेदवार विजयी झाले. तर महीला आरक्षणामधुन भामाबाई पवार, आनंदीबाई शिंदे विजयी झाल्या अनुसुचित जाती जमाती मधून महादेव भोसले तर भटक्या विमुक्त जाती मधून संजय शिंगाडे,तर ओबीसी गटातुन रणजित काळे हे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.सिध्दनाथ ग्रामविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाल्याचे घोषित करताच कार्यकत्यानी फटाक्यांची आतीषबाजी करीत तसेच गुलालाची उधळण करीत डॉलबीच्या तालावर ताल धरीत आनंदोत्सव साजरा केला.यावेळी काळमवाडी, फळवणी,पिलीव येथे विजयी मिरवणूक काढण्यात आली.या निवडणुकीत काळमवाडी विकास परिवर्तन आघाडीचा एकही उमेदवार विजयी झाला नाही.त्यामुळे येणाऱ्या काळात कोणतीही निवडणूक असू द्या विरोधकांवर कधीच विजयाचा गुलाल पडू देणार नाही.असे दादा शिंगाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.यावेळी पिलीव पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दत्ता खरात व सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.