रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यकारणी बरखास्त – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई/प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) या पक्षाची नवीन सदस्य नोंदणी सुरू करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील राज्य कार्यकारिणी ; प्रदेश कार्यकारिणी ; जिल्हा कार्यकारिणी ; तालुका कार्यकारिणी; शहर कार्यकारिणी; वॉर्ड ; शाखा कार्यकारिणी आशा सर्व कार्यकारिणी आणि पदे बरखास्त करण्यात आली असल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे.सांताक्रूझ पूर्व कालिना येथील भीम छाया सांस्कृतिक केंद्र येथे रिपाइं च्या बैठकीत ना रामदास आठवलेंनी ही घोषणा केली. यावेळी रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे;कमलेश यादव; बाळासाहेब गरुड; सिध्दार्थ कासारे; किसन रोकडे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) नोंदणीकृत पक्ष असून या पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली असून येत्या दि. 10 मार्च पर्यंत सदस्य नोंदणी मोहीम पूर्ण करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 25 मार्च 2020 पर्यंत रिपाइं पक्षातील संघटनात्मक निवडणुका घेण्यात येणार आहे.पक्ष संघटनात्मक निवडणूका पार पडे पर्यंत सध्या असलेल्या महाराष्ट्रातील सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. तरिही पक्ष सदस्य नोंदणी यशस्वी करण्यासाठी सध्या असलेल्या रिपाइं च्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी काळजीवाहू कार्यकारिणी म्हणून काम करण्याची परवानगी देण्यात येत असल्याची अधिकृत घोषणा ना रामदास आठवले यांनी केली आहे.
येत्या दि 14 मार्च रोजी घाटकोपर पूर्व पंतनगर आचार्य अत्रे मैदान येथे रिपब्लिकन पक्षाचे मुंबईतील शक्तिप्रदर्शन घडविण्यासाठी रिपाइंचा मुंबई प्रदेश चा मेळावा आयोजित करण्यात आला असून हा मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले. तसेच येत्या दि. 20 फेब्रुवारीला मुंबईत आझाद मैदानात भूमीमुक्ती आंदोलन अंतर्गत मोर्चा काढण्याचे निर्देश ना. रामदास आठवले यांनी कार्यकर्त्याना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *