डॉ.कुमार लोंढे यांचे शिक्षण मंत्री सौ.वर्षाताई गायकवाड यांना खुले पत्र..!

पिलीव/प्रतिनिधी
प्रति,
मा.वर्षाताई गायकवाड.
शिक्षणमंत्री सो
मंत्रालय,मुंबई
महाराष्ट्र

ताई आपणांस सप्रेम जय भीम जय शिवराय !
महाराष्ट्र हा फुले,शाहू व डॉ.आंबेडकरांचा विचारांचा वारसा जपणारे राज्य आहे.आपला विचार देश स्वीकारतोय हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे सबब खालील मुद्यावरती विचार विनिमय कोरोना कालखंडात होणे महत्वपूर्ण आहे.

१) शाळेत स्वतंत्र बोर किंवा ग्रामपंचायत मार्फत पूर्ण वेळ पाण्याची सोय करावी पहिल्या टप्यात 9 वी ते 12 वी चालू होणे महत्वाचे आहे.

२) शासनाने विद्याथी व शिक्षक ,कर्मचारी यांचा 1 कोटी चा विमा उतरावा.

३) CSR फंडमधून पाण्याची टाकी,मास्क,स्यानिटायझर,RO फिल्टर इ तरतूद करावी.

४ ) शाळेस देणगी देणारे दाते यांना आयकरात सूट देऊन शाळा प्रशस्त कराव्यात.

५) अनुदानित ,विनाअनुदानित ,
स्वयंअर्थ असा भेदभाव न करता मराठी माध्यमाच्या शाळा कॉलेज मधील शिक्षक यांना पूर्ण वेतन द्यावे…फारतर आर्थिक भार पडत असेन तर पर्मनंट शिक्षकांचे तसेच शिक्षण विभागातील सर्व अधिकारी,कर्मचारी यांचे महिन्यातील चार दिवसाचे वेतन कपात करून संबंधितांना (विनाअनुदानित, स्वयंअर्थ) न्याय द्यावा.

६) पोषण आहारातील भ्रष्टाचार पाहता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकी विद्यार्थ्यांना दोन देशी अंडी व अर्धा लिटर दुध उपलब्ध करून द्यावे.

७) शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळेल व कोंबडी पालन दूध यातून हजारो रोजगार उपलब्ध होतील.

८) प्रत्येक शाळेस एक डॉक्टर व एक समुपदेशक उपलब्ध करावा कारण प्रत्येक संकटाशी सामना करण्यासाठी मन ,मेंदू शरीर बळकट असावे.

९) शिक्षणविभागातील होणारा प्रचंड भ्रष्टाचार बंद करणेकामी कागदी घोडे नाचवून उपयोग नाही तर सर्व system online करून माजलेल्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवून प्रामाणिक व बेरोजगार तरुणांना संधी द्यावी. ( मी अनुभव घेतला आहे पैसे दिल्याशिवाय कायच काम होत नाही आम्ही सोने गहाण ठेऊन बँकांची कर्जे काढून शाळा चालवतोय..शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रास रक्तपिपासू अधिकारी पोट भरेपर्यत रक्त पिऊन आमचे शोषण करतात)

१०) कित्येक शिक्षक असे आहेत..शाळेतील पगारावर ( विनाअनुदानित, स्वयंअर्थ) घर चालत नाही म्हणून दारूच्या भट्टीवर,बिगारी म्हणून,घर रंगवाय,शेतमजूर म्हणून,वाट्टेल ते काम करत आहेत..कित्येकांच्या बायका सोडून जात आहेत ,शिक्षक आत्महत्या करत आहेत… हे चित्र अतिशय भयानक आहे आदरणीय ताई.

११) शिक्षण व आरोग्य ही सरकारची जबाबदारी असल्याने सरकारने विद्यार्थी, शिक्षक,संस्थापक यांचा दुवा बनून शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी एकूण उत्पन्नाचे ३० % बजेटची तरतूद अर्थसंल्पात करून मोठ्या प्रमाणात CSR उपलब्ध करावा.

१२) कोरोना लस येत नाही तोपर्यंत चार तास शाळा करावी परंतु विद्यार्थी गर्दी होणार असेल तर दोन सत्रात शाळा सुरू करावी.

 वरील १ ते १२ मुद्यावर आपण योग्य तो विचार करून सकारात्म निर्णय घ्यावा मी जे मुद्दे मांडलेत ते अगदी वास्तवदर्शी आहेत यातील एक शब्द ही खोटा नाही.

 आदरणीय ताई आपण हे प्रश्न मार्गी लावू शकता हा आम्हाला विश्वास आहे म्हणून एवढे धाडस करून लिहत आहे. वरील  संदर्भात आम्ही सुद्धा मदत करण्यास व दिल ती जबाबदारी घेण्यास तयार आहोत ...धन्यवाद!

माहितीसाठी प्रत
१) मा.राज्यपाल सो. महाराष्ट्र.
२) मा.मुख्यमंत्री सो.महाराष्ट्र .

आपले विनीत
डॉ.कुमार लोंढे
अध्यक्ष सेंट्रल ह्यूमन राईट संघटन
मु.पो.गारवड (चांदापुरी)*ता.माळशिरस जि. सोलापुर-४१३३१०
मो.7020400150

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *