ओला दुष्काळ जाहीर करा व बजेटचा स्वतंत्र कायदा करावा सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे डॉ.कुमार लोंढे यांची मागणी..!

पिलीव/प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब सोलापूर दौऱ्यावर असताना धर्मपुरी येथे प्रत्यक्ष भेट घेऊन विविध विषयाचे निवेदन सेंट्रल ह्यूमन राईट चे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे यांनी सादर केले.त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,ओला दुष्काळ जाहीर करून अनुसूचित जाती करिता बजेटचा स्वतंत्र कायदा करावा यासह विविध विषयाची मागणी केली आहे


◆महाराष्ट्र सरकारने २०१५ ते २०१९ या काळात अनुसूचित जातीसाठी एकूण ३४,४६६ कोटी रु तरतूद करण्यात आली होती.यापैकी २२,२६८ कोटी रु खर्च करण्यात आले.तर तब्बल १४,१९८ रु खर्च झाले नाहीत.२०१९-२० या अर्थसंकल्पात १२,३०४ कोटी रु घोषणा करण्यात आली होती प्रत्यक्षात ९,२०८ कोटी रु पैकी केवळ ४,४८३कोटी रु खर्च झाले चालू वर्षी २०२०-२१ प्लॅन योजनेचे बजेट १ लाख १५ हजार कोटीचे आहे तेव्हा हा निधी इतरत्र न वर्ग करता अनुसूचित जातीस लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करून स्वतंत्र कायदा पारित करावा तसेच संबंधीत अधिकारी व विभागास अखर्चित निधीस जबाबदार धरून कारवाई करण्यात यावी.
◆कोरोना या जागतिक संकटामध्ये स्वयंर्थ तत्त्वावरील मराठी माध्यमाच्या शिक्षक व प्राध्यापक याना उदरनिर्वाह साधन म्हणून मासिक दहा हजार मानधन सरकारने द्यावे.
◆महाराष्ट्र सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार अनुदान तात्काळ वितरित करावे.
◆ महिला बचत गटाचे सूक्ष्म वित्तीय संस्थांचे संपूर्ण कर्ज माफ करावे.
◆ छोटे व्यावसायिक, छोटे डॉक्टर यांचे कर्ज माफ करावे किंवा दोन वर्षे मुदत वाढ देण्यात यावी.
◆हाथरास येथील पीडितास न्याय मिळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पाठपुरावा चालू आहे त्याची सत्य प्रत देण्यात आली.
रामदासजी आठवले साहेब यांनी सदर प्रकरणी योग्य ती कारवाई करून विषय मार्गी लावणार असल्याचे सांगितले.यावेळी रिपाइंचे सोमनाथ भोसले,नरेंद्र भोसले,किरण तात्या धाइंजे,मिलिंदजी सरतापे,रणजित सातपुते,प्रवीण साळवे,समाधान भोसले,सचिन सरवदे,आण्णा भोसले जय मल्हार संघटनेचे अरुण बोडरे पप्पू सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *