भदंत आनंद कौशल्यायन यांनी सांस्कृतिक परिवर्तनासाठी प्रभावी योगदान दिले – विमलकीर्ती मेश्राम

सातारा/प्रतिनिधी
भदंत आनंद कौशल्यायन हे अगोदर साधू होते.राहुल सांकृत्यायन यांच्या प्रभावाने ते बौध्द विचाराकडे वळाले. १९२७ ते ३२ या काळात ते इंगलंडमध्ये महाबोधी सोसायटी मध्ये राहिले. दोन वर्षे ते आर्यलंड,जर्मनी फ्रांस इत्यादी देशात गेले.१९३५ ला त्यांनी सारनाथ येथील भव्य विहाराचे उद्घाटन केले.धम्मदूत मासिक त्यांनी सुरु केले.भिक्षुक के पत्र या सदरात ते लिहित होते. महाबोधीसभा स्थापनेत कौशल्यायन हे अग्रस्थानी होते .१९४० च्या दरम्यान वर्धा भाषाप्रसार समिती मध्ये ते हिंदी भाषा प्रसार प्रधानमंत्री होते.

डॉ.बाबासाहेब यांचे कार्य माहीत होण्याअगोदर ते कॉंग्रेसचे कार्य करीत होते. बाबासाहेब यांच्याबद्दल त्यांच्या मनात नितांत आदर होता. १४ ऑक्टोबर १९५६ साली ते धर्मांतर कार्यक्रमास उपस्थित राहणार होते,मात्र चीनचे त्यावेळचे सत्ताधारी यांनी दक्षिण आशियातील बौद्ध राष्ट्र प्रतिनिधी मंडळास बोलावले असल्यामुळे ते चीनला गेले होते. मात्र ६ डिसेंबर १९५६ ला बाबासाहेब यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिवाबरोबर ते दिल्लीहून मुंबईला आले.राजगृहातील कार्यक्रमात देखील त्रिसरण आणि पंचशील म्हटले होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या बुद्ध आणि धम्म्मा या ग्रंथाचे भारतीय भाषात भाषांतर करण्याचा त्यांनी जाणीवेने प्रयत्न केला.सरकारी मानसन्मानाची पर्वा न करता बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक संदेश रुजवण्याचे त्यांनी काम केले. बौद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास करून सांस्कृतिक परिवर्तनाचा विचार भदंत आनंद कौशल्यायन यांनी प्रभावीपणे मांडला असे मत नागपूर येथील पालीभाषा तज्ञ व बौध्द धर्माचे अभ्यासक डॉ.विमलकीर्ती मेश्राम यांनी व्यक्त केले. ते सातारा येथील लुंबिनी संघ व सोलापूर जिल्ह्यातील समता प्रतिष्ठान सेवाभावी संस्था मळोली या दोन्ही संस्थांनी आयोजित केलेल्या बहुजन प्रबोधन वर्ष उपक्रमांतर्गत ऑनलाईन व्याख्यानमालेत ‘भदंत आनंद कौशल्यायन :जीवन व कार्य’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भंडारा येथील माजी प्राचार्य गोविंदा महादेव गणवीर हे उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात दिल्लीचे अभ्यासक कार्यकर्ते डॉ.हरिश्चंद्र जोशी –बौद्ध यांनी भदंत आनंद कौशल्यायन यांचे व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू सांगितले.ते म्हणाले की बौद्ध तत्वज्ञानाचा आणि पाली भाषेचा त्यांचा अभ्यास एवढा होता की वादविवादात त्यांची बरोबरी कोणी करू शकत नव्हते. त्यांचा सखोल व्यासंग होता. त्यांच्या प्रेरणेने आयुष्याच्या अखेरच्या श्वास आहे तो पर्यंत आपण काम करू असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य गोविंद गणवीर म्हणाले की ‘ डॉ.आंबेडकर बौद्ध धम्म घेणार हे कळताच ते बाबासाहेब यांना भेटले. आणि बाबासाहेब यांचे महापरिनिर्वाण झाल्यानतर हिंदी भाषेत त्यांनी बुद्ध आणि धम्म चे भाषांतर केले. कौसल्यायन हे खूप प्रभावशाली बुद्धिमान व्यक्तिमत्व होते.’’
प्रारंभी अरुणाताई मस्के व प्रा.रमेश मस्के यांनी त्रिसरण ,पंचशिल व बुद्ध वंदना घेतली .लुंबिनी संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.गोरख बनसोडे यांनी प्रास्ताविक केले.प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ.सुभाष वाघमारे,डॉ.दिलीप कसबे,आणि प्रा.रमेश मस्के यांनी करून दिला.व्याख्यान कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.प्रदीप शिंदे यांनी केले.आभार एन.टी.रोकडे यांनी मानले. वैशाली बनसोडे व कल्याणी बनसोडे यांनी धम्म पालन गाथा घेतली. या कार्यक्रमास डॉ.पूजा अकोटकर .प्रा.एकनाथ तेलतुंबडे ,विलास गणवीर, महेंद्र माने .समता प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तुकाराम लोखंडे,सम्यक खवळे,नवनाथ वाघमारे,कोमल लोंढे ,डॉ.कमलाकर डोंगरे,विलास गणवीर,प्रा.प्रफुल्ल सरगडे ,बाजीराव शेलार,राजेंद्र ओवाळ,डॉ.सुंदर पोटभरे ,दादासाहेब बनसोडे ,प्रदीप मस्के ,डॉ.दिलीप कांबळे ,प्रा.गुलाबराव अंबपकर,धम्मचारी संघादित्य,प्रा.सर्जेराव कांबळे, मुरलीधर खरात, प्रतिक मेश्राम, गौतम जावळे,दीपक कांबळे,या शिवाय सोलापूर,पुणे,सांगली,कोल्हापूर,सातारा नागपूर व दिल्ली येथील अनेक जिज्ञासू नागरिक या व्याख्यानास उपस्थित होते.दर रविवारी सायंकाळी ६ वाजता एक व्याख्यान या पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे.भारतातील सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक ,आर्थिक,सांस्कृतिक,व राजकीय क्षेत्रात ज्या व्यक्तींनी परिवर्तनवादी काम केले आहे अशा व्यक्तींचे जीवन व कार्य यावर ही व्याखानमाला घेतली जात आहे. या पूर्वी ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड :जीवन कार्य’ यांचे विषयी डॉ ,प्रकाश पवार पुणे यांचे तर‘राजा ढाले जीवन व कार्य’ यावर प्रा.गुलाबराव अंबपकर यांची व्याख्याने झाली आहेत अशी माहिती लुंबिनी संघाचे अध्यक्ष डॉ.गोरख बनसोडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *