महाविद्यालय शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष विजय निकम यांचे दुखःद निधन..!छ.शिवाजी कॉलेजमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली

सातारा दिनांक १६ :महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष व येथील छ.शिवाजी कॉलेजचे माजी प्रबंधक विजय श्रीरंग निकम यांचे गुरुवार दिनांक १५ ऑक्टोबर२०२० रोजी दुपारी अडीच वाजता पुणे येथे यांचे निधन झाले. ते मनमिळावू ,कुशल संघटक ,अभ्यासू नेतृत्व होते. तसेच शिक्षकेतर कर्मचारयाच्या सेवकांसाठी ते अहोरात्र झटत होते .रयत सेवक मित्र मंडळाचे सचिव म्हणून त्यांनी काम केले होते.अभ्यासू रयत सेवक म्हणून त्यांची ख्याती होती.शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे या कामासाठी कोरोनाने मुंबईत गंभीर वातावरण असताना देखील अनेकदा ते मंत्रालयात जात असत. खास करून १२ २४ .१०,२०,३० व सातवा वेतन आयोग यासाठी शिक्षण मंत्री उदय सामंत यांचेशी त्यांनी चर्चा केली होती.सतत ४० वर्षे शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी त्यांनी काम केले. पश्चिम महाराष्ट्रात गनी फरास,मोहन बुडके,सुरेश काकडे व विजय निकम ही अभ्यासू मंडळी कर्मचाऱ्याच्या हितासाठी काम करत .त्यात प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी रजिष्ट्रार पदापर्यंत काम केले . बुडके आणि निकम हे दोन मोठे नेते सातारा ,सांगली ,कोल्हापूर या भागातले मोठे नेते होते. रयत शिक्षण संस्थेचे सचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एस.शिवणकर ,उपप्राचार्या प्रा.डॉ .अनिसा मुजावर.,सामाजिक शास्त्रे विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ.सुरेश झोडगे,स्टाफ वेलफेअर विभागाचे डॉ.सुभाष वाघमारे, प्रबंधक डॉ.अरुणकुमार सकटे,श्री.तानाजी सपकाळ ,कॉलेज मधील सर्व कार्यालयीन सेवक ,प्राध्यापक ,यांनी एकत्र येऊन श्रद्धांजली व्यक्त केली .त्याच्या पाठीमागे त्यांच्या पत्त्नी,दोन मुले असा परिवार आहे .प्राचार्य संघटनेचे पदाधिकारी प्राचार्य नंदकुमार निकम यांचे ते बंधू होते. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *