पिलीव येथे विविध विकास कामांचे उद्धघाटन…!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 व दलित वस्ती सुधार योजनेतून मंजूर झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते,सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी जिल्हा परिषद पशुसंवर्धन सभापती अनिल मोटे,माळशिरस पंचायत समिती सभापती शोभाताई साठे,पंचायत समिती उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, माजी जिल्हा परिषद पशुसंवर्धन सभापती संग्रामसिह जहागीरदार,जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील, राहुल बापू वाघमोडे, सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक विजय पवार, शिवामृत दूध संघांचे संचालक दादासाहेब शिंगाडे, पिलीव गावचे सरपंच नितीन मोहिते,माजी सरपंच संग्राम पाटील,ग्रा.पं सदस्य अविनाश जेऊरकर,तालुका पशुवैदयकीय अधिकारी अविनाश रेडे पाटील, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग माळशिरसचे शिवकुमार कुपल, नागणे साहेब ग्रामविकास अधिकारी अनिल साळजकर, संतोषकुमार शेंडगे सर,विष्णू घाडगे,समशेरसिंग राजपुत,लक्ष्मण भैस यांसह पिलीव गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
