पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदीप्यमान यश..!
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विदयालयाच्या इयत्ता पाचवी व आठवीमधील विद्यार्थ्यांनी 2019-20 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले यामध्ये पाचवीमधील 45 तर आठवीमधील 33 विद्यार्थी पात्र ठरले.यामध्ये इयत्ता पाचवीमध्ये प्रथम तीन क्रमांक संपादन करणारे विद्यार्थी (1) आकांक्षा राजु चौरे – 266 गुण,(2) शर्वरी विजय बंगाळे -262 गुण,(3) आसावरी दिपक माने – 260 गुण तर इयत्ता आठवीमध्ये प्रथम तिन क्रमांक (1) शनीतेज संजय पाटील 244 गुण,(2) संस्कार रणधिरसिंग जामदार- 226 गुण,(3) प्रांजली अभिजित जामदार – 222 गुण.या सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे विभागप्रमुख कुलकर्णी ए ए मँडम, हिरके व्ही पी मँडम ,विदयालयाचे मुख्याध्यापक लेंडवे एस डी,पर्यवेक्षक गायकवाड, स्थानिक स्कुल कमीटी सदस्य संग्रामसिंह जहागिरदार, नारायण पाटील, संभाजी भोसले, माजी शिक्षण संचालक नामदेवराव जरग,जि प सदस्य गणेश पाटील,सरपंच नितीन मोहिते,संग्राम पाटील,प्रकाश घाटे,आरिफखान पठाण,अविनाश जेऊरकर,अमोल मदने,राहुल मदने, नितीन गबाले ,पिलीव पत्रकार संघ यांच्या सह विविध शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांच्या कडुन सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.